भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ७८व्या जयंतीनिमित्त देशातील सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या आठवणी आणि कार्याला उजाळा दिला जात आहे. या निमित्ताने काँग्रेसने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अटल बिहारी वाजपेयी आजारी असताना त्यांना राजीव गांधी यांनी कशी मदत केली होती, याबद्दल अटल बिहारी वाजपेयी सांगताना दिसत आहेत.

हेही वाचा >> उत्तर प्रदेशात काका-पुतणा वाद! ‘कंस’, ‘श्रीकृष्ण’, ‘यदुवंशा’चे दाखले देत शिवपाल यादवांनी लिहिले खुले पत्र

Coco island and Pandit Neharu
Loksabha Election 2024: भाजपाचा दावा किती खरा, किती खोटा? पंतप्रधान नेहरूंच्या निर्णयामुळेच भारताने गमावला का कोको बेटांवरील हक्क?
Uneasiness in Congress as Priyanka Gandhi is not getting a meeting
चंद्रपूर : प्रियंका गांधींची सभा मिळत नसल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींची सभाही रद्द
Narendra Modi criticism that Shiv Sena is fake with Congress
काँग्रेसबरोबर नकली शिवसेना! नरेंद्र मोदी यांची टीका, चंद्रपुरात पंतप्रधानांची पहिली प्रचार सभा
Leaders of India will have a power show tomorrow and organize a meeting at Ramlila ground in Delhi
‘इंडिया’च्या नेत्यांचे उद्या शक्तिप्रदर्शन, दिल्लीत रामलीला मैदानावर सभेचे आयोजन; विरोधकांच्या एकजुटीला बळ

व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे?

“किडनीच्या आजारावरील उपचारासाठी मला डॉक्टरांनी अमेरिकेला जाण्याचा सल्ला दिला होता. मात्र पैशांची जुळवाजुळव करणे शक्य न झाल्यामुळे मला अमेरिकेला जाणे कठीण झाले होते. ही बाब राजीव गांधी यांना समजली. त्यांनी मला फोन केला. त्यानंतर अमेरिकेत जाणाऱ्या शिष्टमंडळात त्यांनी माझा समावेश केला. राजीव गांधी यांच्या या निर्णयानंतर मी शिष्टमंडळाचा एक भाग झालो. त्यानंतर माझ्यावरील उपचाराचा खर्च केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आला. पुढे मी पूर्णपणे बरा झालो,” असे वजपेयी या व्हिडीओमध्ये सांगताना दिसत आहेत.

हेही वाचा >> “उत्पादन शुल्क घोटाळ्यात मनीष सिसोदिया प्रमुख आरोपी पण…” अरविंद केजरीवाल यांचे नाव घेत भाजपाने केला मोठा दावा

राहुल गांधी यांनीदेखील त्यांचे वडील म्हणजेच राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली आहे. त्यांनी ट्विटरवर राजीव गांधी यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच पप्पा तुम्ही कायम माझ्यासोबत आहात. तुम्ही देशासाठी जे स्वप्न पाहिले आहे, त्याला पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन, असे म्हणत राहुल गांधी यांनी राजीव गांधी यांना आदरांजली अर्पण केली आहे.