पंतप्रधान मोदींसोबत चालत असलेल्या शिवराज सिंग चौहानांना सुरक्षारक्षकाने हटकलं; काँग्रेसने शेअर केला व्हिडीओ

काँग्रेसने व्हिडीओ शेअर करत मुख्यमंत्र्यांना अशी वागणूक देणं योग्य आहे का? अशी विचारणा केली आहे

congress, Narendra Modi, Shivraj Singh Chouhan, नरेंद्र मोदी, शिवराज सिंग चौहान,
काँग्रेसने व्हिडीओ शेअर करत मुख्यमंत्र्यांना अशी वागणूक देणं योग्य आहे का? अशी विचारणा केली आहे

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पूर्वांचल एक्स्प्रेस-वेवर पायी चालत असल्याच्या व्हिडीओनंतर विरोधकांनी आता मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांचा एक व्हिडीओ शेअर कर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. काँग्रेसने व्हिडीओ शेअर करत मुख्यमंत्र्यांना अशी वागणूक देणं योग्य आहे का? अशी विचारणा केली आहे.

झालं असं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी भोपाळमध्ये आले होते. राज्यपाल मंगूभाई पटेल, मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यासहित अन्य नेते त्यांच्या स्वागतासाठी हजर होते. दरम्यान यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रदर्शन पाहत असतानाचा एक व्हिडीओ काँग्रेसने शेअर करत प्रश्न विचारला आहे.

काँग्रेसने केलेल्या दाव्यानुसार, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत चालत असलेल्या शिवराज सिंग चौहान यांना त्यांच्या सुरक्षारकाने रोखलं. मध्य प्रदेश काँग्रेसने व्हिडीओ ट्वीट करत मुख्यमंत्र्यांना अशी वागणूक देणं योग्य आहे का ? अशी विचारणा केली आहे. यानंतर अनेक काँग्रेस नेत्यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे.

काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनीदेखील हा व्हिडीओ ट्वीट करत म्हटलं आहे की, “हे राम…मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांचा त्यांच्याच राज्यात असा अपमान? मोदींनी आधीच आपल्या सुरक्षारक्षकाला हे सर्व करण्यासाठी सांगितलं असणार, अन्यथा कोणी मुख्यमंत्र्यांना कसं काय रोखू शकतं? याआधी जे पी नड्डांसोबत अमित शाह यांनी असंच केलं होतं”.

तर काँग्रेस नेते अशोक बसोवा यांनी म्हटलं आहे की, “साहेब आणि फोटोंच्या मधे येण्यास मनाई आहे, मग ते मुख्यमंत्री का असोत? पहा शिवराज सिंग यांना”.

याआधी अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडीओ शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. या व्हिडीओत पूर्वांचल एक्स्प्रेसच्या उद्घाटनावेळी योगी आदित्यनाथ पायी चालत असून नरेंद्र मोदी गाडीत असल्याचं दिसत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Congress shares video of pm narendra modi cm shivraj singh chouhan sgy

Next Story
बराक ओबामा यांची रोम्नींवर टीका
ताज्या बातम्या