अल हजरत बरेली शरीफचे मौलाना तौकीर रजा खान यांनी बाटला हाऊस एन्काऊंटरबाबत वादग्रस्त विधान केले आहे. तौकीर रझा यांनी बाटला हाऊस चकमक बनावट होती आणि चकमकीत दहशतवादी मारले गेले नाहीत आणि पोलिसांकडून इन्स्पेक्टर महेशचंद्र शर्मा यांची हत्या झाल्याचे म्हटले आहे. २००९ मध्ये सरकार स्थापन होताच या चकमकीची प्रथम चौकशी केली जाईल, असे आश्वासन काँग्रेस पक्षाने दिले होते, पण पक्षाने तसे केले नाही, असा खुलासाही तौकीर यांनी केला. चकमकीत मारल्या गेलेल्या तरुणांना शहीद दर्जा देण्याची मागणी करून त्यांनी, काँग्रेसला मुस्लिमांच्या मनोधैर्याची नाही तर पोलिसांच्या मनोबलाची चिंता आहे, असे म्हटले आहे.

एएनआय वृत्तसंस्थेच्या जारी केलेल्या व्हिडिओमध्ये तौकीर रझा यांनी याबाबत भाष्य केले आहे. “आम्ही नेहमीच काँग्रेसच्या विरोधात होतो हे खरे आहे. माझ्याकडून एक चूक झाली ती म्हणजे काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळे काँग्रेसलाही आपण जवळून पाहिले आहे.. २००९ मध्ये, जेव्हा मी काँग्रेससोबत होतो आणि जिंकलो तेव्हा मी मंचावर सांगितले होते की, काँग्रेसली मी माफ केले आहे असे समजू नये. काँग्रेसने मला आता पॅरोलवर सोडले, भविष्यात तुमचे काम चांगले झाले तर तुमचा विचार केला जाईल, असे रझा म्हणाले.

uddhav thackeray slams narendra modi during in an interview with the indian express
मोफत धान्य देण्यापेक्षा रोजगार का देत नाही? ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांचा मोदींना सवाल
पिंपरी : मावळमध्ये विरोधात काम करणाऱ्या नेत्यांवर होणार कारवाई; भाजप नेत्याचा इशारा
congress chief jitu patwari on bjp
“भाजपा काँग्रेस कार्यकर्त्यांना त्रास देत आहे, म्हणून…”, काँग्रेस खासदाराचा भाजपावर गंभीर आरोप
arvind kejriwal
तुरुंगात अरविंद केजरीवालांचं ४.५ किलो वजन घटलं, आप नेत्या आतिशी म्हणाल्या, “त्यांना काही झालं तर…”

“पण त्यांना वाटले की माझे सरकार स्थापन झाले आहे. त्यांनी मला सांगितले होते की, सरकार स्थापन केल्यानंतर आमचे पहिले काम बाटला हाऊस चकमकीची चौकशी करणे असेल. या चकमकीची चौकशी झाली असती, तर जगाला कळले असते की, मारले गेलेले दहशतवादी नव्हते, त्यांना हुतात्मा दर्जा द्यायला हवा. जे इन्स्पेक्टर शर्मा मारले गेले होते, त्यांना त्यांच्या पोलिसांनी मारले होते. तपास न झाल्यास पोलिसांचे मनोधैर्य खच्ची होईल, असे ते म्हणाले. पोलिसांच्या मनोबलाची त्यांना अधिक काळजी असेल. २० कोटी मुस्लिमांच्या मनोबलाची पर्वा केली नाही. आमची मुले दहशतवादी म्हणून मारली गेली. माझ्या तक्रारी नेहमीच काँग्रेसकडे आहेत, असेही तौकीर रझा यांनी म्हटले आहे.

‘प्रियांका राहुल खरे धर्मनिरपेक्ष’

तौकीर रझा यांनी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये येण्याचे कारण स्पष्ट केले आणि ते म्हणाले, “मी काँग्रेस जवळून पाहिली आहे. मला असे वाटले की काँग्रेसला आरएसएसच्या लोकांनी चारही बाजूंनी घेरले आहे. मी नेहमीच काँग्रेसला विरोध केला आहे आणि करत राहीन. आता जेव्हा मी प्रियंका गांधींना भेटलो तेव्हा मला जाणवले की, यावेळी देशात खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष असलेले, लोकशाहीवर विश्वास असलेले दोन भाऊ-बहीण आहेत. बाकी सगळे ढोंगी आहेत.”

बाटला हाऊस चकमकीत काय घडले?

१३ सप्टेंबर २००८ रोजी राजधानी दिल्लीत वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते, ज्यात ३९ लोकांचा मृत्यू झाला होता आणि १५० हून अधिक लोक जखमी झाले होते. १९ सप्टेंबर २००८ रोजी बाटला हाऊस येथे दहशतवाद्यांना पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आणि एका दहशतवाद्याने आत्मसमर्पण केले, तर दोन दहशतवादी पळून गेले. या चकमकीत इन्स्पेक्टर मोहनचंद शर्मा शहीद झाले आणि पोलीस कर्मचारी बलवंत यांना गोळी लागली होती.