पीटीआय, अहमदाबाद

दहा वर्षानंतर काँग्रेसला गुजरातमध्ये खाते खोलण्यात यश आले आहे. भाजपने २६ जागांपैकी २५ जागा जिंकल्या आहेत. केंद्रीय मंत्री अमित शहा आणि परशोत्तम रुपाला आणि गुजरात भाजपचे अध्यक्ष सीआर पाटील हे विजयी झाले आहेत. अमित शहा यांनी गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून ७.४४ लाख अशा विक्रमी मतांनी विजय मिळवला आहे, तर बनासकांठा (२) येथून काँग्रेसचे गनीबेन नागजी ठाकोर हे एकमेव उमेदवार विजयी झाले. दरम्यान, सुरतची जागा भाजपने यापूर्वीच बिनविरोध जिंकली आहे.

narsayya adam, narsayya adam master,
विधानसभेची उमेदवारी गृहीत धरून नरसय्या आडम यांचे ‘व्होट भी-नोट भी’ अभियान सुरू 
Eknath Shinde
शिंदे-फडणवीस सरकारची दोन वर्षे, मुख्यमंत्र्यांची खास पोस्ट; म्हणाले, “महायुतीमधील पक्षांचा…”
Praniti Shinde, Assembly,
प्रणिती शिंदे यांची विधानसभेसाठी कसोटी
Sangli, Congress, Sharad Pawar group,
सांगलीत जागावाटपावरून काँग्रेस, शरद पवार गटात आतापासूनच कुरघोड्या सुरू
om birla loksabha speaker
बिर्ला यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकमताने निवड; कोण आहेत ओम बिर्ला?
Sofia Firdous, First Muslim Woman MLA,
सोफिया फिरदोस : ओडिशामधील पहिली मुस्लिम स्त्री आमदार
BJP MLA are worried about Congress increasing voter in loksabha election
काँग्रेसला सुगीचे दिवस! मताधिक्य घटल्याने भाजप आमदार चिंतेत, मात्र काँग्रेसमध्ये…
Akkalkot Congress presidents shankar mhetre threat warning to BJP MLA Sachin Kalyanshetty
अक्कलकोट काँग्रेस अध्यक्षाचा आमदार सचिन कल्याणशेट्टींना धमकीवजा इशारा

भाजपने अहमदाबाद पूर्व, अहमदाबाद पश्चिम, बारडोली, भरूच, भावनगर, छोटा उदयपूर, गांधीनगर, जामनगर, जुनागढ, खेडा, महेसाणा, नवसारी, राजकोट आणि साबरकांठा जिंकले आहेत. भरुच मतदारसंघात भाजपचे विद्यामान खासदार मनसुख वसावा यांनी आम आदमी पार्टीच्या चैतर वसावा यांचा ८५,६९६ मतांनी पराभव केला. अहमदाबाद पूर्वमधून एचएस पटेल ४.६१लाख मतांनी विजयी झाले. अहमदाबाद पश्चिममधून दिनेश मकवाना २.८६ लाख मतांनी, हरिभाई पटेल महेसाणामधून ३.२८ लाख मतांनी तर जुनागढमधून राजेश चुडासामा १.३५ लाख मतांनी विजयी झाले.