गांधी कुटुंबियांवरील आपली निष्ठा दाखवण्यासाठी एका काँग्रेस कार्यकर्त्याने हद्दच केली. त्याने नॅशनल हेराल्डप्रकरणी सोनिया आणि राहुल गांधी यांच्यावरील संकट टळल्याने स्वतःची करंगळी कापून नवस फेडला आहे.
कर्नाटकातल्या इंदूवाल सुरेश या कार्यकर्त्याने नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना जामीन मिळावा म्हणून तिरुपतीला नवस केला होता. हा नवस पूर्ण करण्यासाठी त्यांनी  चक्क डाव्या हाताचे एक बोट कापून तिरुपतीच्या हुंडीत टाकलं असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
सुरेशने तिरुपतीला जाऊन आपल्या डाव्या हातचं एक बोट कापून तिरुपतीच्या हुंडीमध्ये टाकले आहे. एक हजार रुपायाच्या नोटामध्ये बोट गुंडाळले आणि सोबत आभाराचे पत्र हुंडीमध्ये टाकली. करंगळी टाकण्याचे कारणही त्याने त्या पत्रात सांगितले. त्याच्या या कृत्याची वार्ता पाहता पाहता वाऱ्यासारखे पसरली.