असंसदीय शब्दांच्या सूचीमुळे वादंग : कोणत्याही शब्दावर बंदी नसल्याचे लोकसभाध्यक्षांचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : ‘भ्रष्टाचार’, ‘बालीशपणा’, ‘नक्राश्रू’ असे दैनंदिन संभाषणात वापरले जाणारे अनेक शब्द लोकसभा सचिवालयाने असंसदीय ठरवून सूचिबद्ध केले आहेत. सूचिबद्ध असंसदीय शब्दांची पुस्तिका प्रसिद्ध झाल्यानंतर विरोधकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित करत त्यास आक्षेप घेतल्याने वादंग निर्माण झाला आहे.

A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची स्थिती कात्रीत अडकल्यासारखी
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
raj thackray mns latest news
मनसेच्या विश्वासार्हतेला उतरती कळा; बदलत्या भूमिकेमुळे पदाधिकारी-कार्यकर्त्यांत संभ्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत ‘आंदोलनजीवी’ हा शब्द वापरला होता. पण, ‘जुमलाजीवी’ हा शब्द असंसदीय मानला गेला आहे. मोदी सरकारच्या कारभारावर टिप्पणी करताना विरोधक वापरत असलेले शब्दच असंसदीय मानले जात असल्याची टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. आता विश्वगुरू हा शब्दही असंसदीय ठरवणार का, असा सवाल काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी केला. ‘‘आम्ही तर आता विश्व ठगगुरू असे  म्हणू’’, अशी उपहासात्मक टिप्पणी काँग्रेसचे शक्तिसिंह गोहील यांनी केली.    

लोकसभा सचिवालयाच्या सूचीमुळे वादंग माजल्यामुळे अखेर लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्रकार परिषद घेऊन गुरुवारी भूमिका स्पष्ट करावी लागली. ‘‘लोकसभा किंवा राज्यसभेत सत्ताधारी वा विरोधी सदस्यांनी एकमेकांवर आरोप करताना वापरलेल्या शब्दाचा संदर्भ लक्षात घेऊन संबंधित शब्द आक्षेपार्ह ठरत असेल तर, कामकाजातून काढून टाकला जातो. ही संसदीय नियमांची पद्धत कायम ठेवली जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही शब्दावर बंदी घातली जाणार नाही’’, असे बिर्ला म्हणाले.

असंसदीय शब्द.. ‘लज्जित’, ‘विश्वासघात’,  ‘नाटक’, ‘ढोंगी’, ‘जुमलाजीवी’, ‘बालबुद्धी’, ‘कोविड स्प्रेडर’, ‘स्नूपगेट’, ‘अराजकतावादी’, ‘शकुनी’, ‘हुकूमशाही’, ‘तानाशाह’, ‘तानाशाही‘, ‘जयचंद‘, ‘विनाश पुरुष’, ‘खलिस्तानी’, ‘खून से खेती’, ‘दोहरा चरित्र’, ‘निकम्मा’, ‘नौटंकी’, ‘रक्तपात’, ‘रक्तरंजित’, ‘लज्जास्पद’, ‘अपमानित’, ‘फसवणूक’, ‘चमचा’, ‘चमचागिरी’, ‘चेला’, ‘बालिशपणा, ‘भित्रा’, ‘गुन्हेगार’, ‘गाढव’, ‘नाटक’, ‘लबाडी’, ‘गुंडागर्दी’, ‘ढोंगी’, ‘अकार्यक्षमता’, ‘दिशाभूल’, ‘खोटे’,  ‘गद्दार’, ‘अपमान’, ‘असत्य’, ‘अहंकार’, ‘भ्रष्ट’, ‘खरीद फारोख्त’, ‘दलाल’, ‘दादागिरी’, ‘विश्वासघात’, ‘मूर्ख’, ‘लैंगिक छळ’ असे अनेक शब्द असंसदीय ठरविण्यात आले आहेत.

लोककसभेच्या सचिवालयाने सूचिबद्ध केलेले असंसदीय शब्द संसदेच्या कामकाजातून काढून टाकले जातील. मात्र, संसदेच्या सभागृहांमध्ये कोणत्याही शब्दावर बंदी घातली जाणार नाही़ – ओम बिर्ला, लोकसभाध्यक्ष