नवी दिल्ली : मुलांच्या लसीकरण मोहिमेला आणखी बळ मिळाले आह़े ‘बायोलॉजिकल ई लिमिटेड’च्या ‘कॉर्बेव्हॅक्स’ या १२ ते १८ वयोगटासाठीच्या लशीच्या मर्यादित आपत्कालीन वापरास केंद्रीय औषध महानियंत्रकांनी परवानगी दिली आह़े

 १२ ते १८ वयोगटासाठी ‘कॉर्बेव्हॅक्स’ लशीच्या आपत्कालीन वापराची शिफारस तज्ज्ञ समितीने १४ फेब्रुवारीला केली होती़  त्यानुसार काही अटींच्या अधीन राहून ‘कॉर्बेव्हॅक्स’ला परवानगी देण्यात आल्याचे सरकारी सूत्रांनी सोमवारी सांगितल़े

fssai to examine mdh and everest spices banned recently in singapore and hong kong
मसाल्यावरील बंदीच्या  सिंगापूर, हाँगकाँगच्या निर्णयाची तपासणी; एफएसएसएआय, मसाला मंडळाचे पाऊल
canada student visa (1)
कॅनडाच्या ‘त्या’ निर्णयाने भारतीय विद्यार्थी अडचणीत, स्टडी व्हिसाऐवजी व्हिजिटर व्हिसावर कॅनडाला जाण्याच्या प्रयत्नात; कारण काय?
Indian Foreign reserves at a record high
परकीय गंगाजळी ६४८.५६ अब्ज डॉलरच्या उच्चांकी पातळीवर
DRDO ACEM Nashik Recuritment 2024
DRDO ACEM नाशिकद्वारे अप्रेंटिसच्या पदासाठी होणार भरती! ३० एप्रिलपर्यंत करू शकता अर्ज, जाणून घ्या पात्रता निकष

‘बायोलॉजिकल ई लिमिटेड’चे गुणवत्ता व नियमन विभागाचे प्रमुख श्रीनिवास कोसाराजू यांनी ९ फेब्रुवारीला केंद्रीय औषध महानियंत्रकांकडे ‘कॉर्बेव्हॅक्स’साठी अर्ज केला होता़  या अर्जानुसार ५ ते १८ वयोगटातील मुलांवर ‘कॉर्बेव्हॅक्स’ लशीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या करण्यासाठी कंपनीला गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये परवानगी मिळाली होती़  त्यानंतर ऑक्टोबरपासून घेतलेल्या चाचण्यांमधून लशीची सुरक्षितता आणि परिणामकारकतेचे मूल्यांकन करण्यात आल़े 

‘कॉर्बेव्हॅक्स’ या लशीच्या दोन मात्रा २८ दिवसांच्या अंतराने घ्याव्या लागतील़  दोन ते आठ डिग्री अंश सेल्सिअस तापमानात या लशीची साठवणूक करावी लागेल़  

याआधी २८ डिसेंबर रोजी केंद्रीय औषध महानियंत्रकांनी प्रौढांसाठी ‘कॉर्बेव्हॅक्स’च्या मर्यादित आपत्कालीन वापरास परवानगी दिली होती़  मात्र, ही लस देशाच्या लसीकरण मोहिमेत सहभागी करून घेण्यात आली नव्हती़

प्रतीक्षा संपणार?

भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन लस १५ ते १८ वयोगटासाठी ३ जानेवारीपासून देण्यात येत आह़े  मात्र, १५ वर्षांखालील मुलांच्या लसीकरणाचा निर्णय अद्याप सरकारने घेतलेला नाही़  लसीकरण मोहिमेची व्याप्ती वाढविण्याचे संकेत मात्र केंद्राने आधीच दिले होत़े आता १२ ते १८ वर्षांपर्यंतच्या मुलांच्या लसीकरणासाठी ‘कॉर्बेव्हॅक्स’चा वापर करता येणार असल्याने पंधरा वर्षांखालील मुलांच्या लसीकरणाची प्रतीक्षा संपण्याचे संकेत आहेत़