ओडिशात बालासोरमध्ये तीन ट्रेन्सचा अपघात झाला. ओडिशा बालासोर बहनागा बाजार स्टेशनजवळ प्रचंड भयंकर असा अपघात झाला आहे. शुक्रवारी रात्री हा अपघात झाला आहे. कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीची टक्कर झाली. दोन ट्रेन्स आणि मालगाडीची धडक यांचा अपघात झाला. या अपघातातील मृतांची संख्या २६१ इतकी झाली आहे तर ९०० प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेबाबत आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हटलं आहे राज ठाकरेंनी?

ओडिशातील बालासोर जवळ ट्रेन अपघाताची दुर्घटना अतिशय दुर्दैवी आहे. ह्या दुर्घटनेत ज्यांनी आपले नातेवाईक गमावले त्यांच्यावर कोसळलेल्या दुःखाची कल्पनाच करवत नाही. ह्या दुर्घटनेत जीव गमावलेल्या प्रवाशांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विनम्र श्रद्धांजली आणि जखमी प्रवासी लवकरात लवकर बरे होऊ देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coromandel express accident in odisha raj thackeray expressed his emotions via tweet scj
First published on: 03-06-2023 at 15:44 IST