Chennai Coromandel Express Accident : ओडिशात बालासोर बहनागा बाजार स्टेशनजवळ कोरोमंडळ एक्स्प्रेस आणि मालगाडीची टक्कर झाल्याने भीषण अपघात झाला. दोन ट्रेन्स आणि मालगाडी एकमेकांना धडकल्याने ही दुर्देवी घटना घडल्याची माहिती समोर आलीय. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात मृतांची संख्या २३८ वर पोहोचली असून ९०० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या भयानक घटनेमुळं संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली आहे. देशभरातून मृतांना श्रद्धांजली वाहण्यात येत असून शोक व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीनंही या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

विराटने ट्वीट करत म्हटलं आहे की, ओडीशामध्ये झालेल्या दुर्देवी ट्रेन अपघाताबद्दल कळताच खूप दु:ख झालं. या अपघातात ज्या लोकांनी प्राण गमावले आहेत, त्यांचं मी सांत्वन करतो. माझे विचार आणि प्रार्थना मृतांच्या नातेवाईकांसोबत आहेत आणि जखमी झालेले प्रवासी लवकरात लवकर बरे व्हावे, यासाठी प्रार्थना करतो.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coromandel express accident odisha train derailed near balasore death count injured updates virat kohli condolences to people who died in this accident nss
First published on: 03-06-2023 at 13:26 IST