ओडिशामध्ये झालेल्या कोरोमंडल एक्स्प्रेसच्या भीषण अपघातात २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर १,००० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. एकीकडे या अपघातातीत मृतांबाबत, जखमींबाबत तसेच मदतकार्याबाबत वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत. अशातच एक वेगळी बातमी समोर आली आहे. अपघाताच्या काही वेळ आधी सीटची अदलाबदल करणारे दोन प्रवासी बचावल्याची घटना समोर आली आहे.

एक व्यक्ती त्याच्या आठ वर्षांच्या मुलीला सोबत घेऊन कोरोमंडल रेल्वेने प्रवास करत होती. परंतु प्रवासादरम्यान, त्यांची मुलगी स्वाती हिने विंडो सीटसाठी हट्ट केल्याने बाप-लेकीने दुसऱ्या डब्यातील प्रवाशांशी सीटची अदला-बदल केली. अपघातावेळी बाप-लेक दोघेही बचावले. ज्या डब्यात त्यांची सीट होती, तो डबा अपघातात पूर्णपणे दुर्घटनाग्रस्त झाला आहे. त्या डब्यातील बहुतांश प्रवासी मृत्यूमुखी पडले आहेत.

Summer desi jugaad
उष्णतेपासून संरक्षणासाठी रिक्षाचालकाचा भन्नाट देशी जुगाड; रिक्षाच्या छतावरील काम पाहून कराल कौतुक!
Passenger shares video of Kashi Express’s overcrowded coach.
” ना एसी, ना अन्न, ना पाणी, वॉशरूममध्ये जाण्यासाठी…..!”, गर्दीने खचाखच भरलेल्या काशी एक्सप्रेसचा Video Viral
Passengers Spider-Man stunt to reach train toilet goes viral
गर्दीने खचाखच भरली होती रेल्वे, टॉयलेटमध्ये जाण्यासाठी प्रवासी झाला स्पायडर मॅन! व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना आवरेना हसू
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास

एम. के देब आणि त्यांची मुलगी खडगपूरला ट्रेनमध्ये चढले होते, त्यांना कटक स्थानकावर उतरायचं होतं. त्यांनी डॉक्टरांची शनिवारची अपॉइंटमेंट घेतली होती. त्यांच्याकडे थर्ड एसी कोचचं तिकीट होतं. परंतु मुलीने खिडकीजवळ बसण्याचा हट्ट केला. देब म्हणाले, आम्ही विंडो सीट मिळावी यासाठी प्रयत्न करत होतो. खडगपूरमधील एका अधिकाऱ्याने सांगितलं आमच्याकडे खिडकीजवळची सीट उपलब्ध नाही. त्यानंतर त्यांनी टीसीकडे विनंती करण्यास सांगितलं. शक्य असल्यास इतर प्रवाशांबरोबर सीटची अदलाबदली करून द्यावी, असंही सूचवलं. त्यानुसार टीसी आणि आम्ही दुसऱ्या डब्यात गेलो. तिथल्या दोन प्रवाशांना विनंती केली. ते दोघेही सीटची अदलाबदल करण्यास तयार झाले. मग ते दोघे आम्ही ज्या डब्यात बसलो होते तिथल्या सीटवर जाऊन बसले तर आम्ही त्यांच्या सीटवर जाऊन बसलो. आमच्या डब्यापासून तीन डब्यांनंतर ही सीट होती.

त्या दोन प्रवाशांचं काय झालं?

आपल्या मूळ सीटपासून तीन डबे दूरच्या सीटवर बसून देब आणि त्यांची मुलगी प्रवास करू लागले. त्यानंतर काही वेळाने या रेल्वेचा भीषण अपघात झाला. या अपघातात २८८ प्रवाशांचा बळी गेला. तसेच १,००० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. सुदैवाने ज्या डब्यातून देब आणि त्यांची मुलगी प्रवास करत होते, त्या डब्याचं फारसं नुकसान झालं नाही. परंतु ज्या डब्यात त्यांची सीट होती, त्या डब्याची अवस्था वाईट होती. त्या डब्यातून प्रवास करणारे बहुतांश प्रवासी मृत्यूमुखी पडले आहेत.

हे ही वाचा >> Odisha Train Accident : कसा झाला अपघात? कारण काय? रेल्वे विभागाने सांगितला संपूर्ण घटनाक्रम

देब यांनी सांगितलं की, त्यांनी ज्या दोन प्रवाशांबरोबर सीटची अदलाबदल केली, त्या प्रवाशांबद्दल त्यांना काहीच माहिती नाही. ते दोघेही सुरक्षित असावेत, अशी प्रार्थना आम्ही देवाकडे करत आहोत.