चिंताजनक! पुन्हा एकदा करोना रुग्णसंख्येत वाढ; गेल्या २४ तासांत आढळले ४६ हजार नवे रुग्ण

देशातील रिकव्हरी रेट ९७.६३ टक्क्यांवर आहे.

Coronavirus in India
पुन्हा एकदा करोना रुग्णसंख्येत वाढ (संग्रहीत प्रातिनिधिक छायाचित्र)

देशात गेल्या अनेक दिवसांपासून करोना रुग्णांची संख्या ४० हजारांपेक्षा कमी होती. मात्र, गेल्या २४ तासांत पुन्हा रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. ही वाढ आधीच्या रुग्णसंख्येत तब्बल २३ टक्के आहे. बुधवारी देशात ४६ हजार १६४ करोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून ६०७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ३४ हजार १५९ जण बरे झाले आहेत. देशातील रिकव्हरी रेट ९७.६३ टक्क्यांवर आहे. विकली पॉझिटीव्हीटी रेट २.२ टक्क्यांवर असून डेली पॉझिटीव्हीटी रेट २.९८ टक्क्यांवर आहे. हा रेट गेल्या ३१ दिवसांपासून तीन टक्क्यापेक्षा खाली आहे.

देशात आतापर्यंत ३ कोटी २५ लाख ५८ हजार रुग्ण आढळले असून त्यापैकी ३ कोटी १७ लाख ८८ हजार ४४० रुग्ण बरे झाले आहेत. देशात सध्या ३ लाख ३३ हजार ७२५ सक्रिय रुग्ण आहेत. तर आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४ लाख ३६ हजार ३६५वर पोहोचली आहे. तर, एकट्या केरळ राज्यात गेल्या २४ तासांत ३१ हजार ४४५ रुग्ण आढळले असून २१५ जणांचा मृत्यू झाला आहे.

 

दरम्यान, गेल्या २४ तासांत ८० लाख ४० हजार ४०७ जणांना लस देण्यात आली आहे. लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशातील ६० कोटी ३८ लाख ४६ हजार ४७५ जणांचं लसीकरण करण्यात आलंय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Corona cases hike in india on 26 august hrc

Next Story
पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरात पुढील आठवडय़ात वाढ?
ताज्या बातम्या