चीनध्ये करोना व्हायरसने सध्या अक्षरशा थैमान घातल्याचे दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या जीवघेण्या व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा कमालीचा वाढल्याचे दिसत आहे. चीन सरकारने करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ही ५६३ सांगितली आहे. मात्र, तेथील एका वेबसाइटच्या माहितीनुसार हा आकडा आता हजारोंच्या घरात पोहचला आहे.

यासंदर्भात चीनमधील सर्वात मोठ्या टेन्सेन्ट या कंपनीचा डेटा लिक झाल्याने ही खळबळजनक माहिती समोर आल्याचे बोलले जात आहे. या कंपनीच्या दाव्यानुसार सरकारी आकडेवारीपेक्षा दहापट अधिकजणांना करोनाची बाधा झाली आहे. तर,चीनमधील एका न्यूज चॅनलच्या वृत्तानुसार मृतांची खरी आकडेवारी समोर येऊ दिली नसल्याचेही सांगितले गेले आहे.

या माहितीमुळे सर्वत्र खळबळ माजल्यानंतर कंपनीने आपल्या संकेतस्थळावरील माहितीत बदल केला. तर, तांत्रिक कारणामुळे हा डेटा लीक झाला असावा, अस देखील बोललं जात आहे.