Corona Update: गेल्या २४ तासांत १५ हजारांपेक्षा कमी रुग्णांची नोंद; सक्रिय रुग्णसंख्येतही मोठी घट

देशातील करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. देशात १५ हजारांपेक्षाही कमी नवे रुग्ण आढळले आहेत.

Coronavirus destroy Brazilian viper venom study claims

देशातील करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. देशात १५ हजारांपेक्षाही कमी नवे रुग्ण आढळले आहेत. देशात गेल्या २४ तासांत १४ हजार १४६ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, १९ हजार ७८८ बाधित करोनातून बरे झाले असून १४४ जणांचा मृत्यू झाला आहे. या नवीन बाधितांसह देशातील एकूण रुग्णसंख्या ३ कोटी ४० लाख ६७ हजार ७१९वर पोहोचली आहे. त्यापैकी ३ कोटी ३४ लाख १९ हजार ७४९ रुग्ण आतापर्यंत बरे झाले असून ४ लाख ५२ हजार १२४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.   

देशातील सक्रिय रुग्णांची संख्या देखील २ लाखांपेक्षा कमी झाली आहे. सध्या देशात १ लाख ९५ हजार ८४६ सक्रिय रुग्ण उपचाराधीन आहेत. ही गेल्या २२९ दिवसांतील सर्वात कमी सक्रिय रुग्णसंख्या आहे. देशाचा रिकव्हरी रेट सध्या ९८.१० टक्क्यांवर आहे. हा दर गेल्या मार्च महिन्यापासून आतापर्यंतचा सर्वाधिक आहे.

दरम्यान, गेल्या २४ तासांत देशात ४१ लाख २० हजार ७७२ जणांचं लसीकरण करण्यात आलं. राष्ट्रीय लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ९७ कोटी ६५ लाख ८९ हजार ५४० जणांचं लसीकरण पूर्ण झालं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Corona country update 17th october recovery rate hrc

Next Story
VIDEO: अस्वच्छ खोली १५ मिनिटांत चकाचक