Corona Update : देशात नव्या बाधितांची संख्या कमी होईना; रुग्णवाढीचा आकडा ३५ हजारांच्या वर!

देशभरात काल विक्रमी लसीकरणाची नोंद करण्यात आली आहे. दिवसभरात अडीच कोटी लोकांना करोना लस देण्यात आली आहे.

Corona
(प्रातिनिधीक छायाचित्र)

देशात रुग्णसंख्येत घट होत होत असताना पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. काल ३४ हजार ४०३ रुग्ण आढळल्यानंतर आज रुग्णसंख्या ३५ हजारांवर गेली आहे. गेल्या २४ तासांत देशात ३५ हजार ६६२ करोनाबाधित आढळले असून ३३ हजार ७९८ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तसेच २८१ जणांच्या मृत्यची नोंद करण्यात आली आहे. देशात सध्या ३ लाख ४० हजार ६३९ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात नव्या बाधितांसह एकूण रुग्णसंख्या ३ कोटी ३४ लाख १७ हजार ३९० झाली आहे.

देशाचा रिकव्हरी रेट ९७.६५ टक्क्यांवर आहे. तसेच आतापर्यंत ३ कोटी २६ लाख ३२ हजार २२२ बाधितांनी करोनातून बरे झाले आहेत. देशभरात करोनामुळे आतापर्यंत ४ लाख ४४ हजार ५२९ जणांना जीव गमवावा लागला आहे.

देशाचा विकली पॉझिटीव्हीटी रेट २.२ टक्क्यांवर असून हा दर गेल्या ८५ दिवसांपासून तीन टक्क्यांपेक्षा कमी आहे. तर डेली पॉझिटिव्हीटी रेट २.४६ टक्क्यांवर असून हा दर १९ दिवसांपासून तीन टक्क्यांच्या खाली आहे.

दरम्यान, देशभरात काल विक्रमी लसीकरणाची नोंद करण्यात आली आहे. दिवसभरात अडीच कोटी लोकांना करोना लस देण्यात आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Corona country update 18 september hrc