Corona Update: देशात गेल्या २४ तासांत सर्वात कमी रुग्णांची नोंद; ३६५ जणांचा मृत्यू

देशातील रुग्ण बरे होण्याचा दर ९८.१९ टक्के आहेत.

corona updates

देशात करोना रुग्णसंख्येत घट कायम आहेत. गेल्या २४ तासांत देशभरात १२ हजार ४२५ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ही रुग्णसंख्या २३८ दिवसांपैकी सर्वात कमी आहे. देशातील रुग्ण बरे होण्याचा दर ९८.१९ टक्के आहेत. देशात गेल्या २४ तासांमध्ये ३६५ जणांचा मृत्यू झाला असून १५ हजार ९५१ जण करोनातून बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण ३ कोटी ३५ लाख ८३ हजार ३१८ जणांनी करोनावर मात केली आहे.  

देशात सध्या १ लाख ६३ हजार ८१६ सक्रिय रुग्ण उपचाराधीन आहेत. विकली पॉझिटीव्हीटी रेट १.२४ टक्के असून डेली पॉझिटीव्हीटी रेट १.१० टक्क्यांवर आहे. देशात गेल्या २४ तासांत ६४ लाख ७५ हजार ७३३ जणांचं लसीकरण करण्यात आलं. लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यत १०२ कोटी ९४ लाख १ हजार ११९ जणांचं लसीकरण पूर्ण झालंय.

महाराष्ट्रातील करोनाची परिस्थिती..

सोमवारी राज्यात ८८९ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, १ हजार ५८६ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर, १२ करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील करोना महामारीची दुसरी लाट आता ओसरली आहे. शिवाय, करोनामधून बरे होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ सुरू आहे. ही बाब निश्चतच राज्यासाठी दिलासादायक आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ६४,३७,०२५ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.४७ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,०३,८५० झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १४००२८ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Corona country update 25th october hrc

Next Story
शांत व आरोग्यदायी झोपेसाठी सेंद्रिय बिछाना