Corona Update: गेल्या २४ तासांत ३११ रुग्ण दगावले, नवीन बाधितांच्या संख्येत वाढ

देशात सोमवारच्या तुलनेत मंगळवारी करोनाबाधितांच्या संख्येत वाढ नोंदवण्यात आली आहे.

Coronavirus destroy Brazilian viper venom study claims

देशात करोनाच्या रुग्णसंख्येत मोठी घट होत आहे. दुसरी लाट देशभरात ओसरल्याचं चित्र दिसतंय. देशात गेल्या २४  तासांत करोनाचे ११ हजार ९०३ रुग्ण आढळले आहेत. ही रुग्णसंख्या सोमवारी पेक्षा तुलनेने थोडी जास्त आहे. सोमवारी देशात १० हजार ४२३ नवीन रुग्ण आढळून आले होते. तर, ४४३ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली होती. गेल्या २४ तासांत नव्या रुग्णसंख्येसह ३११ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासांत १४ हजार १५९ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत.

देशात सध्या १ लाख ५१ हजार २०९ सक्रिय रुग्ण उपचाराधीन आहेत. ही सक्रिय रुग्णसंख्या गेल्या २५२ दिवसांतील सर्वात कमी आहे. देशभरात आतापर्यंत ३ कोटी ३६ लाख ९७ हजार ७४० जण करोनातून बरे झाले आहेत.

गेल्या २४ तासांत देशात ४१ लाख १६ हजार २३० जणांचं लसीकरण करण्यात आलं. राष्ट्रीय लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १०७ कोटी २९ लाख ६६ हजार ३१६ जणांचं लसीकरण पूर्ण झालंय.

राज्यातील परिस्थिती..

राज्यात मंगळवारी दिवसभरात १ हजार ९५ रूग्ण करोनामुक्त झाले असून, १ हजार ७८ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. याचबरोबर, ४८ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६४,५३,५८१ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.५९ टक्के एवढे झाले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Corona country update today hrc 97

Next Story
सचिन संपलेला नाही!