देशात करोनाच्या रुग्णसंख्येत मोठी घट होत आहे. देशात गेल्या २४ तासांत करोनाचे १० हजार ४२३ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर, ४४३ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नवीन रुग्णांसह एकूण बाधितांची संख्या ३ कोटी ४२ लाख ९६ हजार २३७वर पोहोचली आहे. तसेच गेल्या २४ तासांत १५ हजार २१ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. देशात सध्या १ लाख ५३ हजार ७७६ सक्रिय रुग्ण उपचाराधीन आहेत. तर देशातील पॉझिटिव्हिटी रेट १.०३ टक्क्यांवर आहे.

देशात करोनामुळे आतापर्यंत एकूण ४ लाख ५८ हजार ८८० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत ३ कोटी ३६ लाख ८३ हजार ५८१ जणांनी करोनावर मात केली आहे. दरम्यान, गेल्या २४ तासात ५२ लाख ३९ हजार ४४४ जणांचं लसीकरण करण्यात आलं. राष्ट्रीय लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १०६ कोटी ८५ लाख ७१ हजार ८७९ जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रातील करोनाची परिस्थिती..

राज्यात सोमवारी दिवसभरात १ हजार ९०१ रूग्ण करोनामुक्त झाले असून, ८०९ नवीन करोनाबाधित आढळले आहेत. तर, दहा करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ६४,५२,४८६ करोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण(रिकव्हरी रेट) ९७.५९ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील करोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या ६६,११,८८७ झाली आहे. तर, आजपर्यंत राज्यात १४०२२६ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.