करोना मातेचं ‘ते’ मंदिर पाचव्याच दिवशी जमीनदोस्त

गावकऱ्यांनी पोलिसांवर हे मंदिर पाडल्याचा आरोप केला आहे. मात्र पोलिसांनी हा आरोप फेटाळून लावला आहे.

corona mata temple in uttar pradesh
उत्तर प्रदेशमध्ये बांधण्यात आलेलं करोना मातेचं मंदिर

करोनाला पिटाळून लावण्याच्या मागणीसाठी उभारलेलं उत्तरप्रदेशातलं करोना माता मंदिर शुक्रवारी रात्री पाडण्यात आलं आहे. याबद्दल ग्रामस्थ्यांनी पोलिसांवर आरोप केले आहेत. मात्र पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. पोलिसांनी सांगितलं की, हे मंदिर वादात अडकलेल्या जागेवर उभं होतं. त्यामुळे या वादात सहभागी असलेल्यांपैकीच कोणीतरी हे मंदिर पाडलं आहे.

गावकऱ्यांनी सांगितलं की, हे मंदिर लोकवर्गणीतून लोकेश कुमार श्रीवास्तव यांनी पाच दिवसांपूर्वीच उभारलं होतं. त्याचबरोबर या मंदिरात “करोना माते”ची प्रतिष्ठापनाही करण्यात आली होती. त्यासाठी गावातले राधेश्याम वर्मा यांची पुजारी म्हणून नेमणूकही करण्यात आली होती.

आणखी वाचा- करोना मातेची मास्क लावलेली मूर्ती आणि दर्शनासाठी ग्रामस्थांची रांग; मातेचा आवडता रंग पिवळा!

नोएडामध्ये राहणारे लोकेश यांच्यासोबतच नागेश कुमार श्रीवास्तव आणि जयप्रकाश श्रीवास्तव यांच्या मालकीची ही जमीन आहे. या मंदिराच्या उभारणीनंतर लोकेश यांनी गाव सोडलं आणि नोएडाला परतले.

याप्रकरणात नागेश यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हे मंदिर फक्त जमीन लाटण्यासाठी बांधण्यात आलं. उत्तर प्रदेशच्या प्रतापगडमधल्या शुक्लपूर गावातला हा प्रकार आहे.

गावातल्या एका मोठ्याशा कडुलिंबाच्या झाडाखाली करोना मातेचं मंदिर होतं. या मंदिरात करोना माता म्हणून एका मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. या मूर्तीला मास्क देखील घातलेला होता. या मूर्तीच्या मागच्या भिंतीवर करोनाबाबतचे सर्वात महत्त्वाचे उपाय दिलेले होते. यामध्ये मास्क घाला, हात वारंवार धुवा आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा असं लिहिण्यात आलं होतं. करोना मातेचं दर्शन घेण्यासाठी ग्रामस्थ देखील शिस्तीत करोनाचे सर्व नियम पाळूनच उभे राहतात.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Corona mata temple built in up village demolished after five days vsk

ताज्या बातम्या