देशात करोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. करोनाचा वाढता संसर्ग बघता केंद्र सरकारकडून पुन्हा एकदा निर्बंध लागू केले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर देशभरात दोन दिवसीय करोना मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आलं आहे. तसेच केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवियादेखील आज AIIMS झज्जरला भेट देणार आहेत.

हेही वाचा – ‘नंदिनी’साठी ‘अमूल’वर बहिष्कार; कर्नाटकातील हॉटेल व्यावसायिकांचा निर्णय

mumbai, registered vehicle number, RTO, traffic jam, vehicular pollution
मुंबईत वाहतूक कोंडी, प्रदूषणाचे संकट; वर्षभरात अडीच लाख वाहनांची नोंदणी; एकूण वाहने ४६ लाखांवर
High Blood Pressure Cases, High Blood Pressure Rising in india, 4 out of 10 Patients Not Checking, Patients Not Checking Regularly, high blood pressure unhealthy lifestyle, smoking,
१० पैकी ४ रूग्णांची उच्च रक्तदाब तपासणी करण्यास टाळाटाळ! अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे हृदयविकार व स्ट्रोकचा धोका…
The Food and Agriculture Organization of the United Nations has projected an increase in wheat production worldwide including in India
भारतात यंदा उच्चांकी गहू उत्पादन? काय कारण? जगात काय स्थिती?
tuberculosis tb patients marathi news, pm narendra modi tb medicines marathi news
औषधांच्या तुटवड्यासंदर्भात क्षयरुग्णांचे पंतप्रधानांना पत्र

देशात दोन दिवसीय करोना मॉकड्रिल

करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार अर्लट मोडवर आहे. देशात सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस करोना मॉकड्रिल घेण्यात येणार आहे. ही मॉकड्रिल सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये होणार असून यादरम्यान रुग्णालयातील पायाभूत सुविधा, औषधांचा साठा,ऑक्सिजनची उपलब्धता, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची संख्या यासह अनेक गोष्टींचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

आरोग्य मंत्र्यांकडून एम्स झज्जरला भेट

आज आरोग्य मंत्री मनसुख मांडविया झज्जर येथील एम्स रुग्णालयाला भेट देणार असून ते येथील परिस्थितीचा आढवा घेणार आहेत. या संदर्भात माध्यमांशी बोलताना, नागरिकांनी घाबरू नये, मात्र सतर्क राहावे, असे आवाहन त्यांनी केले. करोनाचा सामना करण्यासाठी सरकार पूर्णपणे सज्ज असून ऑक्सिजन पुरवठा आणि औषधींचा साठा उपलब्ध असल्याची माहितीही त्यांनी दिली.

हेही वाचा – अधिवासाच्या शोधार्थ चित्ता भरकटणे नैसर्गिक घटना; वरिष्ठ वनाधिकाऱ्याचा निर्वाळा 

देशभरात करोना रुग्णांची संख्या वाढली

दरम्यान, रविवारी देशभरात ५३५७ नवीन करोना रुग्ण आढळले. तर सक्रीय रुग्णांची संख्या ३२ हजार ८१४ वर पोहोचली आहे. महाराष्ट्रातही करोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. राज्यात रविवारी करोनाचे ७८८ नवीन रुग्ण आढळून आले. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. राज्यात सध्या करोनाचे ४ हजार ५८७ सक्रीय रुग्ण आहेत.