राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा करोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारकडून पुन्हा एकदा मास्कसक्ती करण्यात आली आहे. मास्क न घातल्यास नागरिकांना ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. खाजगी चारचाकी वाहनातून एकत्र प्रवास करणाऱ्या नागरिकांना मास्कसक्ती नसल्याचे सरकारने काढलेल्या अधिसुचनेत म्हटले आहे.

दिल्लीतील लोकनायक जय प्रकाश नारायण रुग्णालयामध्ये करोनाच्या ओमिक्रॉन विषाणूचा आणखी एक उपप्रकार आढळून आला आहे. ‘BA २.७५’ या नव्या ओमिक्रॉन विषाणूच्या संसर्गाचा दर जास्त असल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक सुरेश कुमार यांनी दिली आहे.

Health Tips : पाणी पिण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहित आहे का? एक चूक ठरू शकते गंभीर आजारांचे कारण

दरम्यान, बुधवारी दिल्लीत २ हजार १४६ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली होती. तर संसर्गाचा दर १७.८३ टक्क्यांनी वाढला होता. गेल्या १८० दिवसांमध्ये राजधानी दिल्लीत सर्वाधिक आठ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला होता. मंगळवारीही दिल्लीत सात रुग्णांना करोनामुळे आपला जीव गमवावा लागला होता. तर २ हजार ४९५ जणांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते.

Health Tips : ‘या’ गोष्टी खाल्ल्यावर येऊ शकतो राग; तापट माणसांनी अजिबात करू नये सेवन

येत्या काळात देशभरात अनेक सण-उत्सव साजरे केले जातील. यावेळी ठिकठिकाणी गर्दी होण्याची शक्यता असल्याने करोनाचा प्रसार वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा संसर्ग नियंत्रणात ठेवण्याचे मोठे आव्हान सरकारपुढे असणार आहे.

राजधानी दिल्लीत सोमवारी १ हजार ३७२ नवे करोना रुग्ण आढळून आले होते. तर सहा जणांचा करोनामुळे मृत्यू झाला होता. संसर्गाच्या दरात २१ जानेवारीपासून सर्वाधिक १७.८५ टक्के वाढ झाल्याची नोंदही करण्यात आली होती.