Corona Update: देशात गेल्या २४ तासांत ३६ हजार ४०१ रुग्ण आढळले; ५३० जणांचा मृत्यू

देशात आतापर्यंत ४ लाख ३३ हजार ४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

corona
corona update

देशात गेल्या काही दिवसांपासून ४० हजारांपेक्षा कमी रुग्ण आढळत आहेत. गेल्या २४ तासांत ३६ हजार ४०१ नवीन करोनाबाधित आढळले आहेत. तर, ५३० रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली असून ३९ हजार १५७ जणांनी करोनावर मात केली आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या ३ कोटी २३ लाखांवर गेली असून त्यापैकी ३ कोटी १५ लाख २५ हजार ८० रुग्ण बरे झाले आहेत.

देशात सध्या ३ लाख ६४ हजार १२९ सक्रिय रुग्ण उपचाराधिन आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या गेल्या १४९ दिवसांतील सर्वात कमी आहे. तर, आतापर्यंत ४ लाख ३३ हजार ४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाचा रिकव्हरी केट ९७.५३ टक्के आहे. तर विकली पॉझिटीव्हीटी रेट १.९५ टक्के असून गेल्या ५५ दिवसांपासून हा रेट ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच डेली पॉझिटीव्हीटी रेट १.९४ टक्के असून तो गेल्या २४ दिवसांपासून ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे. आतापर्यंत ५०.०३ कोटी करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशातील लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ५६ कोटी ६४ लाख ८८ हजार ४३३ जणांचं लसीकरण पूर्ण झालंय. गेल्या २४ तासांत देशभरात ५६ लाख ३६ हजार ३३६ जणांना करोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Corona update india 19 august hrc

Next Story
पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरात पुढील आठवडय़ात वाढ?
ताज्या बातम्या