देशात पुन्हा ३ लाखांपेक्षा जास्त करोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत देशभरात ३ लाख ६ हजार ६४ रुग्ण आढळले आहेत. शनिवारच्या तुलनेत रविवारी २७ हजार ४७९ कमी रुग्णांची नोंद झाली आहे. रविवारी ४३९ जणांचा मृत्यू झाला असून २ लाख ४३ हजार ४९५ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशात सध्या २२ लाख ४९ हजार ३३५ सक्रिय रुग्ण उपचाराधीन असून पॉझिटीव्हीटी रेट २०.७५ टक्क्यांवर आहे. तर, आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३ कोटी ६८ लाख ४ हजार १४५ वर पोहोचली आहे. विकली पॉझिटिव्हीटी रेट १७.३ टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, राष्ट्रीय लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १६२.२६ कोटी लोकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत.

अर्थसंकल्पीय संसद अधिवेशनच्या पार्श्वभूमीवर करोना चाचण्या सुरू –

संसदेतील कर्मचाऱ्यांची करोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ८७५ लोकांचे निकाल पॉझिटिव्ह आले आहेत. हा डेटा करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या सुरुवातीपासून ते २० जानेवारीपर्यंत घेण्यात आलेल्या चाचण्यांचा आहे. तिसरी लाट सुरू झाल्यापासून संसदेत तब्बल २८४७ जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या आणि त्यापैकी ८७५ चाचण्या पॉझिटिव्ह आल्याचे सूत्रांनी सांगितले. एकूण चाचण्यांपैकी ९१५ राज्यसभा सचिवालयाने घेतल्या आणि त्यातील २७१ जण पॉझिटिव्ह आढळले, असे त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona update latest covid 19 news vaccination omicron patient in india hrc
First published on: 24-01-2022 at 10:07 IST