Corona Update : देशात गेल्या २४ तासांत ३७ हजार २९१ रुग्णांनी केली करोनावर मात!

देशात करोनाची दुसरी लाट ओसरू लागलेली असताना नवे करोनाबाधित आणि बऱ्या होणाऱ्या रुग्णांची आकडेवारी दिलासादायक ठरली आहे.

Coronavirus India Updates, Delta plus variant, India records new cases
देशातील रिकव्हरी रेट म्हणजे रुग्ण बरे होण्याऱ्या रुग्णांचं प्रमाणही वाढलं आहे. देशातील रिकव्हरी रेट ९७.१७ टक्क्यांवर पोहोचला आहे.

देशात अनेक राज्यांनी स्थानिक पातळीवर करोनासंदर्भातले निर्बंध शिथिल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तर काही राज्यांमध्ये लॉकडाउनचा कालावधी वाढवला जात आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या २४ तासांमधे देशात नव्या करोनाबाधितांची संख्या घटल्याचं समोर आलं आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार देशात २४ तासांत ४१ हजार ६४९ नवे करोनाबाधित आढळून आले आहेत. शुक्रवारी हाच आकडा ४४ हजार २३० इतका होता. त्याोबतच देशात गेल्या २४ तासांत ३७ हजार २९१ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. हे रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे. त्यामुळे करोनावर मात केलेल्या रुग्णांची आजपर्यंतची आकडेवारी आता ३ कोटी ७ लाख ८१ हजार २६३ इतकी झाली आहे.

 

नव्याने सापडलेल्या ४१ हजार ६४९ करोनाबाधितांमुळे आता भारतात आजपर्यंत करोनाची लागण झालेल्या नागरिकांचा आकडा ३ कोटी १६ लाख १३ हजार ९९३ इतका झाला आहे. मात्र, त्यापैकी आजघडीला फक्त ४ लाख ८ हजार ९२० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Coronavirus : राज्यात दिवसभरात ७ हजार ४३१ रूग्ण करोनामुक्त; २३१ करोनाबाधितांचा मृत्यू

दरम्यान, देशभरात गेल्या २४ तासांमध्ये ५९३ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आजपर्यंत एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा ४ लाख २३ हजार ८१० इतका झाला आहे. मात्र, देशपातळीवर गेल्या काही दिवसांमध्ये मृतांच्या आकड्यांमध्ये झालेली घट पाहाता हा काही प्रमाणात आरोग्य यंत्रणांसाठी दिलासा मानला जात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Corona updates in india shows 37291 recoveries and 593 deaths pmw

ताज्या बातम्या