नवी दिल्ली : ‘लस मैत्री’ कार्यक्रमांतर्गत, तसेच ‘कोव्हॅक्स’ जागतिक सेतूबाबत आपली बांधिलकी निभवण्यासाठी भारत पुढील महिन्यापासून अतिरिक्त करोना प्रतिबंधक लशींची निर्यात पुन्हा सुरू करेल; तथापि आपल्या स्वत:च्या नागरिकांचे लसीकरण करण्यास सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असेल, असे आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी सोमवारी सांगितले.

ऑक्टोबरमध्ये सरकारला करोना   लशींच्या ३० कोटींहून अधिक मात्रा मिळतील, तर येत्या तीन महिन्यांत १०० कोटींहून अधिक मात्रा त्याला प्राप्त होतील, अशी माहिती त्यांनी दिली. देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या करोना प्रतिबंधक लसमात्रांची संख्या ८१ कोटींपलीकडे केली असून, अखेरच्या १० कोटी मात्रा केवळ ११ दिवसांत देण्यात आल्या, असेही त्यांनी सांगितले.

आपल्या  नागरिकांचे लसीकरण हेच सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगून मांडविया म्हणाले की, ‘व्हॅक्सिन मैत्री’ कार्यक्रमांतर्गत आणि ‘कोव्हॅक्स’बाबत आपली बांधिलकी पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त लशींची निर्यात पुढील तिमाहीत (ऑक्टोबर- डिसेंबर) सुरू होईल. ‘वसुधैव कुटुंबकम’ या आपल्या ध्येयवाक्याला अनुसरून हे असल्याचे मांडविया म्हणाले.

कोविड-१९ विरोधातील सामूहिक लढ्यात जगाबाबत भारताची बांधिलकी पूर्ण करण्यासाठी लशींचा अतिरिक्त साठा वापरला जाईल, असे मंत्र्यांनी सांगितले.

करोना लशींबाबत भारतातील स्वदेशी संशोधन व उत्पादन यांच्या महत्त्वावर भर देताना; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अथक प्रयत्न आणि मार्गदर्शन यामुळेच भारत करोना लशींचे संशोधन आणि उत्पादन एकाचवेळी करत असल्याचे मांडविया यांनी सांगितले. भारताची लसीकरण मोहीम हा जगासाठी आदर्श ठरला असल्याचाही त्यांनी उल्लेख केला.