देशात गेल्या २४ तासांत ४२ हजार ९८२ नव्या रुग्णांची नोंद झाली असून ५३३ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण ३ कोटी १८ लाख १२ हजार ११४ जणांना करोनाची लागण झाली आहे. तर करोनाबळींची एकूण संख्या ४ लाख २६ हजार २९० झाली असल्याचे गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे.

उपचाराधीन रुग्णांची संख्या ४ लाख ११ हजार ०७६ झाली असून ती एकूण रुग्णसंख्येच्या १.२९ टक्के इतकी आहे. करोनामुक्त होण्याची टक्केवारी ९७.३७ इतकी आहे.

दैनंदिन रुग्णवाढीचा दर २.५८ टक्के नोंदला गेला, तर साप्ताहिक रुग्णवाढीचा दर २.३७ टक्के इतका नोंदला असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे. आतापर्यंत एकूण ३ कोटी ९ लाख ७४ हजार ७४८  जण करोनामुक्त झाले असून मृत्युदर १.३४ टक्के इतका नोंदला गेला आहे.

बुधवारी १६ लाख ६४ हजार ०३० चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत एकूण ४७ कोटी ४८ लाख ९३ हजार ३६३ चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर देशभरात एकूण ४८.९३ कोटी जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.