देशातील उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत वाढ

देशात गेल्या २४ तासांत ६४० जणांचे मृत्यू झाले असून देशभरात आतापर्यंत एकूण करोनाबळींची संख्या ४ लाख २२ हजार ६६२ झाली आहे.

देशात गेल्या २४ तासांत करोनाच्या ४३ हजार ५०९ नव्या रुग्णांची नोंद झाली असून आतापर्यंत एकूण ३ कोटी १५ लाख २८ हजार ११४ जणांना करोनाची लागण झाली आहे. तर सलग दुसऱ्या दिवशी उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असल्याचे गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे.

देशात गेल्या २४ तासांत ६४० जणांचे मृत्यू झाले असून देशभरात आतापर्यंत एकूण करोनाबळींची संख्या ४ लाख २२ हजार ६६२ झाली आहे. तर उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत ४४०४ ने वाढ होऊन ती ४ लाख ३ हजार ८४० इतकी झाली आहे. एकूण रुग्णांच्या तुलनेत उपचाराधीन रुग्णांची संख्या १.२८ टक्के इतकी आहे. तर करोनामुक्त होण्याची टक्केवारी ९७.३८ इतकी आहे. दैनंदिन रुग्णवाढीच्या दरात वाढ होऊन तो २.५२ टक्के झाला आहे, तर साप्ताहिक रुग्णवाढीचा दर २.३८ इतका नोंदला असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे.

आतापर्यंत एकूण ३ कोटी ७ लाख १ हजार ६१२ जण करोनामुक्त झाले असून मृत्यू दर १.३४ इतका नोंदला गेला आहे. बुधवारी १७ लाख २८ हजार ७९५ चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत ४६ कोटी २६ लाख २९ हजार ७७३ चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशभरात एकूण ४५.०७ कोटी जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Corona virus infection corona positive patient akp 94

ताज्या बातम्या