देशात २४८ दिवसांतील सर्वात कमी उपचाराधीन रुग्णसंख्या

गेल्या २४ तासांत १२,५१४ रुग्णांची नोंद झाली तर २५१जणांचा मृत्यू झाला आहे.

corona-patient
प्रातिनिधीक छायाचित्र

नवी दिल्ली  : देशातील उपचाराधीन रुग्णांत सातत्याने घट होत आहे. गेल्या २४८ दिवसांतील सर्वात कमी उपचाराधीन रुग्णसंख्या रविवारी नोंदली गेली आहे. १ लाख ५८ हजार ८१७ रुग्णसंख्या नोंदली गेली असून ही संख्या एकूण रुग्णसंख्येच्या ०.४६ टक्के इतकी आहे. ही टक्केवारी मार्च २०२० नंतर इतकी कमी नोंदली गेली आहे. तर करोनामुक्त होण्याची टक्केवारी देखील ९८.२० इतकी झाली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी जाहीर केले आहे.

गेल्या २४ तासांत १२,५१४ रुग्णांची नोंद झाली तर २५१जणांचा मृत्यू झाला आहे. सलग २४ दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्या ही २० हजारांखाली तर सलग १२७ दिवसांपासून ५० हजारांखाली नोंदल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे.

 गेल्या २४ तासांत  सक्रिय रुग्णांमध्ये ४५५ ने घट झाली आहे. 

देशभरात आतापर्यंत एकूण ३ कोटी ४२ लाख ८५ हजार ८१४ जणांना करोनाची लागण झाली आहे. तर करोनाबळींची एकूण संख्या ४ लाख ५८ हजार ४३७ झाली आहे. तर मृत्यू दर १.३३ टक्के नोंदला गेला आहे.

आतापर्यंत ३ कोटी ३६ लाख ६८ हजार ५६० जण करोनामुक्त झाले आहेत. रविवारी ८ लाख ८१ हजार ३७९ चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत एकूण ६० कोटी ९२ लाख ०१ हजार २९४ चाचण्या करण्यात आल्या आहेत.  दैनंदिन रुग्णवाढीचा दर १.४२ टक्के इतका नोंदला असून गेल्या २८ दिवसांपासून रुग्णवाढीचा दर २ टक्क्यांहून कमी नोंदला गेला आहे. साप्ताहिक रुग्णवाढीचा दर १.१७  टक्के नोंदला आहे. सलग ३८ दिवसांपासून साप्ताहिक रुग्णवाढीचा दर २ टक्क्यांहून कमी नोंदला गेला आहे. भारतात लसीकरण झालेल्यांची संख्या १०६.३१ कोटी झाली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Corona virus infection corona positive patient corona test akp 94

Next Story
पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरात पुढील आठवडय़ात वाढ?
ताज्या बातम्या