नवी दिल्ली: गेल्या २४ तासांत देशात २९,६१६ जणांना करोनाचा संसर्ग झाल्यामुळे करोनाबाधितांची संख्या ३,३६,२४,४१९ वर पोहचली. याच कालावधीत २९० जणांचा करोनाने मृत्यू झाल्यामुळे करोनामृतांचा आकडा ४,४६,६५८ इतका झाला.

उपचाराधीन रुग्णांची संख्या २४ तासांत १२८० ने वाढून ३,०१,४४२ वर पोहचली. हे प्रमाण एकूण रुग्णांच्या ०.९० टक्के आहे. आतापर्यंत ३,२८,७६,३१९ लोक बरे झाले असून हे प्रमाण ९७.७८ टक्के, म्हणजे मार्च २०२० पासून सर्वाधिक आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत देण्यात आलेल्या लसमात्रांची संख्या ८४.८९ कोटींपेक्षा अधिक झाली आहे.