फायझरची करोनाप्रतिबंधक गोळी

आधी करोनावर जी औषधे वापरण्यात आली ती प्रत्यक्षात करोनावरची नव्हती तर इतर विषाणूजन्य रोगांवर वापरण्यात येत होती.

फायझर कंपनीने कोविड संसर्गावर पॅक्सलोविड ही गोळी तयार केली असून ती विषाणू प्रतिबंधक आहे. त्यामुळे रुग्णालयात दाखल होणे किंवा मृत्यूचे प्रमाण ८९ टक्क्यांनी कमी होणार आहे. इतर औषधांपेक्षा ही गोळी वेगळी आहे. या गोळीच्या वापरापूर्वी ऑस्ट्रेलियातील औषध नियामक संस्था त्याची परिणामकारकता व सुरक्षितता तपासून बघणार आहेत.

आधी करोनावर जी औषधे वापरण्यात आली ती प्रत्यक्षात करोनावरची नव्हती तर इतर विषाणूजन्य रोगांवर वापरण्यात येत होती. या गोळीच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील जे लोक रुग्णालयात दाखल होण्याच्या स्थितीत होते, त्यांच्यावर करण्यात आलेल्या चाचण्यांचे निष्कर्ष तपासून पाहण्यात येत आहेत.

करोनावर आता विषाणू प्रतिबंधक औषधे तयार करण्याचे काम वेगाने सुरू असून मर्क कंपनीनेही एक औषध तयार केले होते. आता फायझरच्या नव्या गोळीमुळे नव्याने आशा पल्लवित झाल्या आहेत.

पॅक्सलोव्हिड हे दोन एचआयव्ही औषधांचे मिश्रण असून त्यात रिटोनावीर व पीएफ ०७३२१३३२ या प्रायोगिक गोळीचा समावेश आहे. रिटोनावीर हे औषध पीएफ ०७३२१३३२ या प्रायोगिक गोळीचे कार्य नियंत्रित करते. ते औषध विघटित न होता थेट विषाणूपर्यंत पोहोचणे आवश्यक असते. एकूण १२१९ रुग्णांवर या औषधाचे प्रयोग करण्यात आले आहेत. यात ८९ टक्के लोकांना फायदा झाल्याचे दिसून आले आहे. पॅक्सलोव्हिड गोळी दिल्यानंतर २६ दिवसांनी  एकही मृत्यू झाल्याचे आढळून आले नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Corona virus infection corona vaccination pfizer corona vaccine inhibitors akp

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य
ताज्या बातम्या