करोना प्रतिबंधक धोरण गतिशील, नावीन्यपूर्ण असावे

लशीची एक मात्रा वाया गेली, तर कुणा तरी व्यक्तीला या रोगापासून आवश्यक असलेल्या संरक्षणापासून वंचित राहावे लागते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला उद्देशन काय सांगणार याची सर्वांना उत्सुकता आहे.

पंतप्रधानांचे अधिकाऱ्यांना आवाहन

करोना महासाथीला तोंड देण्यासाठीचे धोरण गतिशील व नावीन्यपूर्ण असावे आणि ते सतत अद्ययावत केले जावे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितले.

देशातील जिल्हा दंडाधिकारी आणि क्षेत्र अधिकारी यांच्याशी संवाद साधताना मोदी यांनी करोना विषाणूचे वर्णन ‘धूर्त’ आणि ‘बहुरूपी’ असे केले. या विषाणूमुळे तरुण व मुले यांना जो धोका आहे, त्याबाबत समाजाच्या निरनिराळ्या वर्गांत व्यक्त करण्यात येत असलेल्या चिंतेचाही त्यांनी उल्लेख केला. याचा पाठपुरावा करावा, तसेच आपल्या जिल्ह्यातील करोनाचा संसर्ग आणि त्याबाबत असलेल्या गांभीर्यची योग्य नोंद ठेवावी, असे आवाहन त्यांनी या अधिकाऱ्यांना केले.

लशीची एक मात्रा वाया गेली, तर कुणा तरी व्यक्तीला या रोगापासून आवश्यक असलेल्या संरक्षणापासून वंचित राहावे लागते. त्यामुळे लशी वाया जाण्यास प्रतिबंध करण्याची आवश्यकता आहे, असेही मोदी म्हणाले. करोना महासाथीचा सामना करण्याबाबत मोदी यांनी अधिकाऱ्यांच्या तुकडीशी साधलेला हा दुसरा संवाद होता.

ग्रामीण भागांना करोनाच्या संसर्गापासून मुक्त करण्यासाठी काम करावे आणि गावकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांच्याशी बोलावे, अशी सूचना पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना केली. करोनाबाधितांची संख्या कमी झाली, तरी आवश्यक ती खबरदारी घेतली जाईल हे निश्चित करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. करोना संसर्गाच्या प्रकरणांची संख्या कमी झाली असली, तरी जोवर हा संसर्ग अगदी कमी प्रमाणातही कायम आहे तोवर त्याचे आव्हानही कायम आहे, याचा त्यांनी उल्लेख केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Corona virus prevention policy should be dynamic innovative akp

Next Story
आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांना “संगणक साक्षर” करण्याची योजना बारगळली
ताज्या बातम्या