पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा, करोना बाधितांची संख्या झाली १ हजार

शेजाऱच्या पाकिस्तानात करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे.

शेजाऱच्या पाकिस्तानात करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. पाकिस्तानात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १ हजार पर्यंत पोहोचली आहे. पाकिस्तानात पूर्णपणे लॉकडाउन करण्यात आलेलं नाही. पण पाकिस्तानातील वेगवेगळया प्रांतांनी परस्पराशी संपर्क बंद केला आहे.

पाकिस्तानातून लोक मोठया संख्येने इराणला यात्रेसाठी गेले होते. त्यामुळे पुढच्या काही दिवसात पाकिस्तानात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची  संख्या आणखी वाढू शकते. यात्रेवरुन परतल्यानंतर हे नागरीक वेगवेगळया भागात विखुरले गेले. त्यामुळे पुढच्या काही दिवसात रुग्ण संख्या मोठया प्रमाणावर वाढू शकते असा इशारा पाकिस्तानातील डॉक्टरांनी दिला आहे.

करोनाने पाकिस्तानाही शिरकाव केला आहे. त्यामुळे लॉकडाउन केलं जावं अशी मागणी तिथे होत होती. मात्र पंतप्रधान इम्रान खान यांनी हे शक्य नसल्याचं सांगितलं. देशातील एक तृतीयांश जनता दारिद्र्य रेषेखाली जगत असून रोजंदारीवर आपलं पोट भरत असल्याचं इम्रान खान यांनी सांगितलं. त्यामुळे संपूर्ण देश लॉकडाउन करण शक्य नाही असं म्हटलं होतं.

“पूर्ण लॉकडाउन करणं म्हणजे कर्फ्यू लागू करणे. लोकांना जबरदस्ती घऱाच्या आत राहण्यास भाग पाडणे. आमच्या देशातील २५ टक्के जनता ही दारिद्र्य रेषेखाली जगत असून रोजंदारीच्या कमाईवर आपलं पोट भरते. आम्ही आमची स्थिती लक्षात घेता योग्य ती पाऊलं उचलत आहोत,” असं इम्रान खान यांनी सांगितलं होतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Coronavirus cases has hit 1000 in pakistan dmp

ताज्या बातम्या