Coronavirus: सकारात्मक बातमी! देशाच्या रुग्ण बरे होण्याच्या दरात वाढ; दैनंदिन रुग्णांच्या संख्येतही घट

आकडे कमी जास्त होत असले तरी स्वयंप्रेरणेने करोना प्रतिबंधक नियमावलीचे पालन करणे आवश्यकच

COVID-19 Update in India, Coronavirus Update

गेल्या काही दिवसांपासून देशात सुरू असलेला करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव काहीसा ओसरताना दिसत आहे. समोर येणारी आकडेवारी तर असेच संकेत देत आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या दैनंदिन आकडेवारीनुसार, करोना रुग्णसंख्येत आणि मृतांच्या संख्येतही गेल्या काही दिवसांपासून चढउतार दिसून येत आहे.

गेल्या २४ तासांमध्ये देशात २५ हजार ४०४ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे आता उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या तीन लाख ६२ हजार २०७ झाली आहे. तर काल दिवसभरात ३७ हजार १२७ रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता तीन कोटी २४ लाख ८४ हजार १५९ वर पोहोचली आहे.


हेही वाचा – केंद्राकडून तीनपट प्राणवायूची सोय करण्याची सूचना – डॉ. शिंगणे

देशातला रुग्ण बरे होण्याचा दर आता ९७.५८ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर गेल्या ८१ दिवसांपासून रुग्ण बरे होण्याचा साप्ताहिक दर सातत्याने तीन टक्क्यांच्या खालीच आहे.

देशात काल दिवसभरात ३३९ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोविड आजारामुळे मृत पावलेल्यांची एकूण संख्या आता चार लाख ४३ हजार २१३ वर पोहोचली आहे.

देशात करोना प्रतिबंधक लस घेतलेल्या एकूण नागरिकांची संख्या आता ७५ कोटी २२ लाख ३८ हजार ३२४ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासात ७८ लाख ६६ हजार ९५० नागरिकांनी करोना प्रतिबंधक लस टोचून घेतली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Coronavirus india number of new patients death and recoveries daily vsk

ताज्या बातम्या