कोव्हॅक्सिन ७७.८ टक्के परिणामकारक

१६ नोव्हेंबर ते यावर्षी १७ मे दरम्यान या चाचण्या घेण्यात आल्या, त्यात १८ वर्षावरील लोक सहभागी झाले होते. 

covaxin-1

भारतात  तयार करण्यात आलेली कोव्हॅक्सिन ही लस ७७.८ टक्के परिणामकारक असून ती लक्षणे असलेल्या रुग्णात परिणामकारक व सुरक्षित असल्याचे लॅन्सेट नियतकालिकाने शुक्रवारी म्हटले आहे.

   या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्ष हाती आले असून या लशीमुळे कुठलाही धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कोव्हॅक्सिन ही एका निष्क्रिय विषाणूपासून तयार केलेली लस असून तिचे उत्पादन हैदराबाद येथील भारत बायोटेक कंपनीने केले आहे. या लशीला अलीकडे जागतिक आरोग्य संस्थेने वयाच्या १८ वर्षावरील लोकांसाठी वापराकरिता आपत्कालीन परवानगी दिली आहे.

   तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यात असे दिसून आले, की कोव्हॅक्सिन लशीमुळे प्रतिपिंडांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होत असून या लशीचे कुठलेही हानिकारक परिणाम नाहीत. या लशीमुळे करोनामुळे मृत्यूचा धोकाही कमी होतो. लशीमुळे डोके दुखणे, दमल्यासारखे वाटणे, ताप, वेदना हे परिणाम जाणवतात पण ते सौम्य असतात. सात दिवसात हे परिणाम दिसतात. ही लस २-८ अंश तापमानाला साठवता येत असून या लशीच्या दोन मात्रा २८ दिवसांच्या अंतराने दिल्या जातात. १६ नोव्हेंबर ते यावर्षी १७ मे दरम्यान या चाचण्या घेण्यात आल्या, त्यात १८ वर्षावरील लोक सहभागी झाले होते.  संशोधकांनी म्हटले आहे,की यात काही जणांना प्लासेबो तर काहींना लस देण्यात आली होती. लस दिलेल्या गटात २४ जण संसर्ग झालेले होते. एकूण ८४७१ जणांना लस देण्यात आली  होती. ८५०२ जणांना प्लासेबो म्हणजे खोटे औषध देण्यात आले होते, त्यापैकी १०६ जणांमध्ये करोनाचा संसर्ग दिसून आला. ही माहिती प्राथमिक असून यात नमुना संख्या वाढवण्याची गरज आहेत. यात साठ वर्षावरील २७५० व्यक्तींचा समावेश होता, तर ५७२४ जणांना सह आजार होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Coronavirus infection corona vaccine covaxin effective akp

Next Story
शांत व आरोग्यदायी झोपेसाठी सेंद्रिय बिछाना
ताज्या बातम्या