Coronavirus: हा जगातल्या सगळ्यात बलाढ्य अर्थव्यवस्थेवरील हल्ला; ट्रम्प यांचा चीनवर निशाणा

अमेरिकेत करोनाने थैमान घातला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं मोठं आव्हान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर आहे

अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (संग्रहित छायाचित्र)

अमेरिकेत करोनाने थैमान घातला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं मोठं आव्हान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर आहे. अमेरिकेत करोनामुळे आतापर्यंत ४७ हजाराहून जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर करोनाची लागण झालेल्यांची संख्या आठ लाखांच्याही पुढे आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी हा आपल्या देशावर झालेला हा हल्ला असल्याचं सांगत चीनवर निशाणा साधला आहे. “आमच्यावर हल्ला झाला आहे. हा एक हल्ला होता. हा फक्त एक फ्लू नाही आहे. १९१७ नंतर कोणीही अशी परिस्थिती पाहिलेली नाही,” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

अमेरिकेवरील वाढत्या कर्जासंदर्भात प्रश्नाचं उत्तर देताना डोनाल्ड ट्रम्प यांनी हे वक्तव्य केलं आहे. करोनामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसलेला असून सरकारला लोक आणि उद्योगांना दिलासा देण्यासाठी पॅकेज जाहीर करावं लागत आहे. यामुळे कर्जाच्या रकमेत वाढ होत असल्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना विचारण्यात आलं होतं.

आणखी वाचा- “कोणतीही चूक करु नका, करोना बराच वेळ आपल्यासोबत राहणार आहे”; WHO चा इशारा

“आमच्याकडे दुसरा पर्याय आहे का ? अजिबात नाही. मला नेहमीच प्रत्येक गोष्टीची चिंता असते. आम्हाला ही समस्या सोडवावी  लागणार आहे,” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे. “आमची अर्थव्यवस्था जगातील सर्वात बलाढ्य अर्थव्यवस्था होती. चीन किंवा इतर कोणत्याही देशापेक्षा उत्तम होती,” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी सांगितलं.

आणखी वाचा- “करोनापेक्षाही मोठं संकट भविष्यात येण्याची शक्यता”

“आम्ही गेल्या तीन वर्षात अर्थव्यवस्था उभी केली होती. पण एक दिवस ते आले आणि अचानक बंद करण्यास सांगितलं. पण आम्ही पुन्हा सुरुवात करणार आणि त्याच मजबुतीने उभे राहू. पण यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूकही करावी लागणार आहे,” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी सांगितलं. “आम्ही आमच्या विमान कंपन्या वाचवल्या. आम्ही अनेक कंपन्यांनाही वाचवलं. अनेक कंपन्यांनी गेल्या दोन वर्षात कधीही गेली नाही इतकी प्रगती केली होती. पण अचानकपणे या कंपन्या बंद झाल्या असून मार्केटमधून बाहेर गेल्या आहेत,” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं.

आणखी वाचा- Coronavirus: चीनवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढला, चौकशी करण्याची ऑस्ट्रेलियाची मागणी

डोनाल्ड ट्रम्प यांनी करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असल्याचं सांगताना जोपर्यंत परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येत नाही तोपर्यंत अजिबात आराम करणार नसल्याचं म्हटलं आहे. आपण पुन्हा एकदा उभारी घेऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Coronavirus lockdown us president donald trump says greatest economy attacked sgy

ताज्या बातम्या