करोनावर औषध : भारतात ‘रेमडेसिवीर’चे उत्पादन घेण्यास, विकण्यास दोन कंपन्यांना परवानगी

करोना रुग्णांसाठी दिलासा देणारी बाब

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार करोना व्हायरसवर जे औषध प्रभावी ठरतंय, त्या औषधाचं आता भारतात उत्पादन होणार आहे. एवढंच नाही तर त्याची विक्रीही करता येणार आहे. त्या औषधाचं नाव आहे रेमडेसिवीर. भारताच्या औषधी महानियंत्रक विभागानं या रेमडेसिवीर औषधाच्या उत्पादनासाठी हेटेरो आणि सिप्ला या दोन कंपन्यांना परवानगी दिली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे.

रेमडेसिवीर हे औषध महाराष्ट्र सरकारलाही हवे होते. त्यासाठी बांगलादेशातून त्याची आयात करण्यात येणार होती. मात्र, काही कारणास्तव ही आयात थांबवण्यात आली आहे. आता भारतातच त्याचे उत्पादन होणार असल्याने करोना रुग्णांसाठी ही बाब दिलासा देणारी आहे.

सूत्रांच्या हवाल्यानं पीटीआयनं म्हटलंय की, जे करोना पॉझिटिव्ह रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत ‘केवळ त्यांच्यासाठी’ हे रेमडेसिवीर औषध वापरण्यात येणार आहे. यासाठी त्याचं उत्पादन आणि विक्री यासाठी हेटेरो आणि सिप्ला या कंपन्यांना परवानगी देण्यात आली आहे. शनिवारी औषधी महानियंत्रक विभागानं हा निर्णय घेतला.

भारतीय औषध महानियंत्रक संस्थेनं फेविपिरावीर या औषधाच्या उत्पादन आणि वितरणासाठी ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स या कंपनीली परवानगी दिली होती. करोना संसर्गावर अशा प्रकारे मंजुरी मिळालेले हे पहिलेच औषध ठरले होते. आता त्यानंतर रेमडेसिवीर या औषधाच्या उत्पादनासाठीही परवानगी मिळाली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Coronavirus medicine hetero cipla get nod to manufacture market antiviral drug remdesivir for covid 19 pkd

ताज्या बातम्या