Coronavirus: खरी मर्दानी! २६३ भारतीय विद्यार्थ्यांना इटलीतून मायदेशी सुखरुप परत घेऊन आली

एअर इंडियाचे बोईंग ७७७ विमान घेऊन त्या इटलीमध्ये गेल्या

करोनामुळे जगभरामध्ये भीतीचे वातावरण आहे. चीनमधील वुहान येथून पसरत गेलेल्या या विषाणूचा संसर्ग आता १०० हून अधिक देशांमध्ये पोहचला आहे. युरोपीयन देशांबरोबरच आशियामधील अनेक देश करोनाचा फैलाव रोखण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत. मात्र इटलीमध्ये करोनाने अगदी थैमान घातलं आहे. इटलीमध्ये करोनामुळे पाच हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर इटलीमध्ये अडकलेल्या २६३ भारतीय विद्यार्थ्यांना एअर इंडियाच्या विशेष विमानाने भारतात आणण्यात आलं. रविवारी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमातळावर इटलीहून आलेल्या एअर इंडियाच्या विशेष विमानाने लॅण्डींग केलं. या विमानातील सर्व विद्यार्थ्यांच्या शरिराचे तापमान तपासून त्यांची आरोग्य चाचणी करुन आयटीबीपीच्या छावला येथील छावणीमध्ये विलगीकरणामध्ये ठेवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे इटलीमधून या विद्यार्थ्यांना भारतामध्ये आणणाऱ्या विमानाचं सारथ्य एका महिला वैमानिकाने केलं होतं. या महिला वैमानिकाचं नाव आह कॅप्टन स्वाती रावल.

स्वाती या दिल्लीमधून एअर इंडियाचे बोईंग ७७७ विमान घेऊन इटलीमध्ये गेल्या आणि तेथून २६३ भारतीय विद्यार्थ्यांना सुखरुप परत घेऊन आल्या. करोनाचा सर्वाधिक प्रभाव असणाऱ्या देशामधून भारतीयांची सुखरुप सुटका करण्यामध्ये मोलाचा वाट उचणाऱ्या स्वाती यांनी एक लहान मुलगाही आहे. २०१० साली जेव्हा पहिल्यांना एअर इंडियाने सर्व महिलांचा समावेश असणारे एअर इंडियाचे विमान मुंबईहून न्यूयॉर्कला पाठवले होते तेव्हा स्वाती चर्चेत आल्या होत्या. त्या या महिला क्रूच्या सदस्या होत्या. स्वाती यांना विमान उड्डान करण्याचा १५ वर्षांचा अनुभव आहे.

फोटोगॅलरी >> करोनाने इटलीत का घेतले इतके बळी?; जाणून घ्या २० महत्वाच्या गोष्टी

स्वाती यांना लढाऊ विमान चालवण्याची इच्छा होती. आपण फायटर जेट चालवावे असे त्यांचे लहानपणापासूनचे स्वप्न होतं. मात्र त्यावेळी भारतामध्ये महिला वैमानिकांना लढाऊ विमानं चालवण्याची परवाणगी नव्हती. त्यामुळेच त्यांनी कमर्शियल पायलेट होण्याचा निर्णय घेतला.स्वाती यांनी इटलीमधून भारतीय विद्यार्थ्यांना परत आणल्याचे वृत्त व्हायरल झाल्यानंतर सोशल नेटवर्किंगवर अनेकांनी त्यांचे कौतुक केलं.

नक्की वाचा >> “आम्ही सर्व आशा सोडून दिल्यात” म्हणत खरंच इटलीचे पंतप्रधान रडले का?; जाणून घ्या सत्य

यशस्वी महिला वैमानिक होण्याच्या या प्रवासामध्ये आपल्या कुटुंबाने आपल्याला कायमच पाठिंबा दिला असं स्वाती अभिमानाने सांगतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Coronavirus meet captain swati rawal the brave mother who flew the plane which brought our people home safely from italy scsg

ताज्या बातम्या