scorecardresearch

Coronavirus: गाडीमध्ये सेक्स करताना आढळलं जोडपं, करोनासंदर्भातील सरकारी आदेश मोडल्याप्रकरणी कारवाई

करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या प्रदेशात घडला हा धक्कादायक प्रकार

Coronavirus: गाडीमध्ये सेक्स करताना आढळलं जोडपं, करोनासंदर्भातील सरकारी आदेश मोडल्याप्रकरणी कारवाई

करोनाने इटलीमध्ये थैमान घातलं आहे. येथे करोनामुळे मरण पावलेल्यांचा आकडा पाच हजारांहून अधिक झाला आहे. याच पार्श्वभूमीवर इटलीमधील अनेक शहरे पूर्णपणे लॉकडाउन करण्यात आली आहेत. नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी फिरवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. अशाच एक विचित्र घटना समोर आली असून येथील मिलान शहरातील पोलिसांनी लॉकडाउनदरम्यान सरकारने घालून दिलेले निर्बंध मोडून भटकणाऱ्या एका जोडप्याला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी या दोघांना अटक केली तेव्हा हे गाडीमध्येच सेक्स करताना आढळून आले. देशामध्ये लॉकडाउनची परिस्थिती असताना दुसरीकडे अशी विचित्र बातमी समोर आल्यामुळे या जोडप्याबद्दल अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका २३ वर्षीय तरुणाला आणि ४० वर्षीय महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेला तरुण मूळचा इजिप्तचा असून महिला ट्यूनेशियाची आहे. मिलान शहराबाहेरील परिसरामध्ये हे दोघे गाडी रस्त्याच्या बाजूला लावून गाडीमध्ये शरीरसंबंध ठेवताना पोलिसांना आढळून आले. आश्चर्याची बाब म्हणजे ज्या परिसरामधून यांना अटक करण्यात आले तेथे करोनाचा मोठा प्रादूर्भाव दिसून येत आहे. मिलान हे शहर करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या लॉम्बार्डी प्रांतामध्ये आहे. असं असतानाही या जोडप्याने शासन आदेश मोडून घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. प्रशासनाने घालून दिलेले निर्बंध मोडल्याप्रकरणी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्त एएनएसए या वृत्तसंस्थेने दिले आहे. इटलीमध्ये एका गाडीमध्ये दोघांना प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे.

नक्की पाहा >> करोनाने इटलीत का घेतले इतके बळी?; जाणून घ्या २० महत्वाच्या गोष्टी

या दोघांवर नक्की पुढे काय कारवाई करण्यात येणार आहे हे स्पष्ट झालेलं नाही, असं डेली मेल युके ने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे. इटलीमध्ये सध्या वाहनांच्या दळणवळणावर पोलिसांची करडी नजर असून प्रत्येक हलचालीवर बारीक लक्ष ठेवलं जात आहे. सध्या इटलीमध्ये केवळ जीवनावश्यक वस्तू, औषधे आणि अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांनाच प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Coronavirus milan couple having sex in car arrested for breaching covid 19 lockdown protocol scsg

ताज्या बातम्या