scorecardresearch

करोनाच्या नव्या लाटेमुळे चीनसमोर आर्थिक संकट! पगार न मिळाल्याने अनेक शहरांमध्ये नागरिकांची आंदोलनं; पाहा Video

चीनला करोनाचा आर्थिक फटका बसत असून आता चिनी लोकांकडे पैसेच उरलेले नाहीत असं चित्र पाहायला मिळत आहे

करोनाच्या नव्या लाटेमुळे चीनसमोर आर्थिक संकट! पगार न मिळाल्याने अनेक शहरांमध्ये नागरिकांची आंदोलनं; पाहा Video
अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांनी आंदोलनं केली आहेत (फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Protest for Salary in China: चीनमध्ये करोनाच्या नव्या लाटेमुळे हाहाकार माजला आहे. करोना संसर्गामुळे अनेक प्रांतांमधील रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध नसल्याच्या बातम्या समोर येत असतानाच या लाटेमुळे चीनला मोठा आर्थिक फटका बसल्याचे संकेतही मिळत आहेत. जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेंच्या यादीत असलेल्या चीनला करोनाचा आर्थिक फटका बसत असून आता चिनी लोकांकडे पैसेच उरलेले नाहीत असं चित्र दिसत आहे. अनेक ठिकाणी लोकांचे पगार रखडले आहेत. त्यामुळे आधीच करोनाचं संकट त्यात केलेल्या कामाचे पैसे रखडले असे दुहेरी संकट चिनी नागरिकांसमोर आहे. सोशल मीडियावर सध्या औषधांसाठी लोक अगदी भीक मागत असल्याचे व्हिडीओही व्हायरल झाले होते. आता अनेक शहरांमध्ये चिनी लोक पगाराच्या पैशांसाठी रस्त्यावर उतरत असल्याचंही पहायला मिळत आहे.

नक्की पाहा >> Photos: ओसाड शहरे, औषधांसाठी स्पर्धा, प्लास्टिकमध्ये गुंडाळेली बाळं, PPE किटमध्ये रिक्षावाले अन्… चीनमध्ये करोनामुळे हाहाकार

चीनमधील आर्थिक परिस्थितीची दाहकता दर्शवणारा एक व्हिडीओ २४७ चायना न्यूज या ट्विटर हॅण्डलवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत अनेक सुरक्षारक्षक आंदोलन करताना दिसत आहेत. या सुरक्षारक्षकांना पगार मिळालेला नसल्याने ते आंदोलन करत असल्याचा दावा केला जातोय. चीनमधील इतर अनेक शहरांमध्ये कंपन्यांनी पगार रखडवल्याने लोकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. अनेकजण पगाराचे पैसे द्यावेत या मागणीसाठी हातात बॅनर घेऊन रस्त्यावर प्रदर्शन करताना दिसत आहे. ही आंदोलने आणि कंपन्यांनी या संकटाची चाहूल लागल्यानंतर घेतलेली भूमिका पाहता चीन त्यांच्यावरील कर्ज संकटाची आकडेवारी लपवतंय की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे.

नक्की पाहा >> Photos: चीन सरकार म्हणतं, ‘आठच करोना मृत्यू’ पण एकाच दिवसात मृत्यूपत्रासाठी ११ लाख अर्ज; नव्या दफनभूमींच्या संख्येनंही गूढ वाढलं

शून्य करोना धोरणाअंतर्गत चीनने लागू केलेले निर्बंध डिसेंबरच्या सुरुवातीला उठवल्यानंतर देशात करोनाची लाट आली आहे. शून्य करोना धोरणाला लोकांनी केलेल्या विरोधामुळे सरकारने माघार घेत शून्य करोना धोरण मागे घेत निर्बंध शिथिल केले. मात्र या शून्य करोना धोरणाअंतर्गत घातलेल्या निर्बंधांमुळे आर्थिक फटका बसला.

नक्की पाहा >> दफनभूमीबाहेर लांबच लांब रांगा, नातेवाईकांना तासनतास बघावी लागतेय वाट; चीनमधील करोना प्रादुर्भावाची दाहकता दाखवणारा Video

खास करुन स्थानिक आणि केंद्रातील सरकारला राजस्वाच्या माध्यमातून मिळणारी कमाईही घटली. बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्सच्या (बीआयएस) एका नव्या अहवालानुसार चीनमध्ये गैरवित्तीय क्षेत्रावरील कर्जाचं प्रमाण हे ५१.८७ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचलं आहे. ही रक्कम चीनच्या जीडीपीच्या २९५ टक्के इतकी आहे. सन १९९५ नंतर चीनवर यापूर्वी कधीच एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्ज नव्हतं.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-12-2022 at 13:06 IST

संबंधित बातम्या