जगभरातला करोना प्रादुर्भाव कमी होतो न् होतो तोच आता करोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने डोकं वर काढलं आहे. करोनाच्या डेल्टा तसंच इतर व्हेरिएंटपेक्षा हा व्हेरिएंट अधिक धोकादायक असल्याचं सांगितलं जात आहे. अद्याप या व्हेरिएंटबद्दल फारशी माहिती उपलब्ध नसली तर त्याबद्दलचा शोध आणि अभ्यास सुरूच आहे. त्याचबरोबर या व्हेरिएंटवर कोणती लस प्रभावी असेल याबद्दलही अद्याप संशोधन आणि अभ्यास सुरू आहे. अशातच आता नोवावॅक्स या लस उत्पादक कंपनीने मोठं विधान केलं आहे. लवकरच ओमायक्रॉनचा सामना करण्यासाठीची लस बाजारात येणार असल्याचे संकेत नोवावॅक्सने दिले आहेत.

करोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराचा सामना करण्यासाठीच्या लसीबद्दलचं संशोधन करण्यात सध्या शास्त्रज्ञ व्यस्त आहेत. अनेक लस उत्पादक कंपन्यांनी आता या विषाणूविरोधातली लस शोधून काढण्याची तयारी सुरू केली आहे. नोवावॅक्स लस उत्पादक कंपनीने सांगितलं की ओमायक्रॉन विरोधात लढण्याची क्षमता असलेल्या लसीची निर्मिती पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यापासून सुरू होईल. कंपनीने सांगितलं की यापूर्वी नोवावॅक्सची कोविड लस टोचून घेतलेल्या व्यक्तीमधल्या अँटिबॉडीजची माहिती येत्या काही आठवड्यात घेतली जाईल आणि त्यावरुन ही लस नव्या व्हेरिएंटवर उपयुक्त आहे की नाही याचा अभ्यास केला जाईल.

नोव्हावॅक्सने असेही म्हटले आहे की त्यांनी ओमिक्रॉन-विशिष्ट स्पाइक प्रोटीन प्रतिजन विकसित करण्यास सुरुवात केली आहे आणि काही आठवड्यांत या प्रकाराशी लढण्यास सक्षम असलेल्या नवीन लसीच्या चाचण्या सुरू करेल.या नव्या व्हेरिएंटने जगाला चांगलंच संकटात टाकलं आहे. या व्हेरिएंटमुळे महामारीचा कालावधी अजून किती वाढेल आणि सध्या वापरात असलेल्या या व्हेरिएंटपासून किती संरक्षण करु शकतील, अशा चिंता जगाला भेडसावू लागल्या आहेत.