राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तालिबानशी तुलना; न्यायालयानं फेटाळला अटपूर्व जामीन अर्ज

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तालिबानशी तुलना केल्यानं न्यायालयानं अटपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.

taliban rss
(प्रातिनिधीक छायाचित्र)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही तालिबानी दहशतवादी संघटना असल्याचा आरोप करत ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप असलेल्या एका व्यक्तीला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने सोमवारी अटकपूर्व जामीन नाकारला आहे. न्यायमूर्ती राजेंद्र कुमार वर्मा यांच्या खंडपीठाने त्याला अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला. तसेच अर्जदाराविरुद्ध पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत आणि त्यामुळे त्याची याचिका फेटाळून लावली आहे, असं राजेंद्र वर्मा यांनी म्हटलंय.

सोशल मीडियावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तालिबानी दहशतवादी संघटना असल्याचा आरोप करत काही टिप्पण्या करून त्या व्हायरल केल्याचा आरोप आरोपीवर आहे. त्यामुळे त्याला अटकपूर्व जामिन दिला जाऊ शकत नाही, असं न्यायमूर्तींनी म्हटलंय. तर दुसरीकडे, अर्जदाराच्या वकिलाने असं म्हटलंय की, “राजकीय वैमनस्यमुळे अर्जदाराला या प्रकरणात खोटे गोवण्यात आले आणि त्याने कधीही कोणत्याही धर्म किंवा कोणत्याही संघटनेवर भाष्य केलेले नाही. तसेच त्याच्याविरुद्ध कोणताही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पुरावा नसून केवळ संशयाच्या आधारे त्याला आरोपी करण्यात आले होते, त्यामुळे त्याला अटकपूर्व जामीन मिळावा,” अशी मागणी करण्यात आली होती.

दरम्यान,  न्यायालयाने, खटल्यातील वस्तुस्थिती आणि परिस्थिती लक्षात घेऊन आणि केस डायरीसह रेकॉर्डवरील उपलब्ध सामग्री आणि अर्जदाराने केलेल्या गुन्ह्यांमधील त्याच्या भूमिकेचा तपास करून, त्याच्याविरुद्ध पुरेसे पुरावे उपलब्ध असल्याचे नमूद केले आणि त्यामुळे त्याची याचिका फेटाळल्याचं सांगितलं. 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Court denies bail to a person for comparing rss with taliban hrc

Next Story
पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरात पुढील आठवडय़ात वाढ?