scorecardresearch

मोठी बातमी, दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याप्रकरणी यासिन मलिकला जन्मठेप

दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याप्रकरणी पटियाला हाऊस कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. या प्रकरणातील आरोपी यासिन मलिकला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

yasin-malik-1200

दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याप्रकरणी पटियाला हाऊस कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. या प्रकरणातील आरोपी यासिन मलिकला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच १० लाख रुपयांचा आर्थिक दंडही ठोठावला आहे. आर्थिक दंड न भरल्यास त्याच्या शिक्षेत वाढ होणार आहे. एनआयएने न्यायालयाकडे यासिन मलिकला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती.

न्यायालयाच्या या निकालानंतर यासिन मलिकची रवानगी दिल्लीतील तिहार जेलमध्ये होणार आहे. विशेष म्हणजे यासिन मलिकने या संपूर्ण प्रकरणात वकील घेण्यास नकार दिला होता. तसेच त्याच्यावरील आरोप कबुल केले होते.

काश्मीर फुटीरतावादी नेता यासिन मलिकला राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने दहशतवादी फंडिंग प्रकरणात दोषी ठरवले आहे. मागच्या सुनावणीत यासीन मलिकने दहशतवादासाठी फडिंग केल्याचे आरोप स्वीकारले होते, त्यानंतर न्यायालयाने मलिकला दोषी ठरवले.

मलिकवर गुन्हेगारी कट रचणे, देशाविरुद्ध युद्ध पुकारणे, इतर बेकायदेशीर कारवाया आणि काश्मीरमधील शांतता भंग केल्याचा आरोप होता. १० मे रोजी मलिकने दिल्ली न्यायालयासमोर आपले आरोप कबूल केले होते.

हेही वाचा : शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ; फुटीरतावादी यासिन मलिकला समर्थन देताना म्हणाला, “काश्मीरमध्ये स्वातंत्र्यासाठी…”

या काश्मीर फुटीरवादी नेत्यांवरही आरोप

१० मे रोजी झालेल्या मागील सुनावणीत न्यायालयाने फारुख अहमद दार उर्फ ​​बिट्टा कराटे, शाबीर शाह, मसरत आलम, मोहम्मद युसूफ शाह, आफताब अहमद शाह, अल्ताफ अहमद शाह, नईम खान, मोहम्मद अकबर खांडे, राजा मेहराजुद्दीन कलवाल, बशीर अहमद यांना अटक केली होती. जहूर अहमद शाह वताली, शब्बीर अहमद शाह, अब्दुल रशीद शेख आणि नवलकिशोर कपूर यांच्यासह इतर काश्मिरी फुटीरतावादी नेत्यांवर औपचारिकपणे आरोप निश्चित करण्यात आले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Court sentence life term to terrorist yasin malik for terror funding pbs