scorecardresearch

Premium

महिलांच्या प्रकरणांत न्यायालयांनी संवेदनशील असावे; सर्वोच्च न्यायालयाची सूचना

‘महिलांवरील गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणांमध्ये न्यायालयांनी संवेदनशील असणे अपेक्षित आहे,’ असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

supreme court
सर्वोच्च न्यायालय ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

पीटीआय, नवी दिल्ली : ‘महिलांवरील गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणांमध्ये न्यायालयांनी संवेदनशील असणे अपेक्षित आहे,’ असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. पतीच्या क्रूर वर्तनामुळे महिलेने विषप्राशन करून आत्महत्या केल्याच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने एका व्यक्तीला दोषी ठरवले होते.  त्या निर्णयाला या व्यक्तीसह त्याच्या आईने सर्वोच्च न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान दिले होते. ती फेटाळताना न्यायालयाने हे मत व्यक्त केले.

सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले, की न्यायालयांनी तपास प्रक्रियेतील तांत्रिक त्रुटी, निष्काळजीपणे केलेला तपास किंवा पुराव्यातील विसंगतींचा फायदा उठवण्याची संधी गुन्हेगारांना देऊ नये. कारण गुन्हेगाराला शिक्षा झाली नाही तर, पीडितांची घोर निराशा होईल. न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि प्रशांतकुमार मिश्रा यांच्या खंडपीठाने शुक्रवारी दिलेल्या या निकालात नमूद केले, की न्यायालयांकडून महिलांवर झालेल्या अत्याचारप्रकरणी दाखल खटल्यांबाबत संवेदनशील असावे, अशी अपेक्षा आहे.

retired judge pension
निवृत्त न्यायाधीश २० हजारांत भरणपोषण कसे करणार? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र शासनाला सवाल
supreme court slams centre on woman coast guard officer s plea
महिला किनाऱ्यांचे संरक्षण करू शकतात! महिला अधिकाऱ्यांच्या कायमस्वरूपी सेवेवरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला सुनावले
electoral bonds and supreme court
‘निवडणूक रोखे योजना घटनाबाह्य,’ न्यायालयाचा निर्णय; नेमका निकाल काय?
supreme court on chandigarh
चंदीगड महापौर निवडणुकीला सर्वोच्च न्यायालयाने ‘लोकशाहीची हत्या’ असे का म्हटले? नक्की काय घडले?

 मार्च २०१४ रोजी उत्तराखंड उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाला आव्हान देणाऱ्या दोन दोषींच्या याचिका फेटाळत सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला. उच्च न्यायालयाने या प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाचा निकाल कायम ठेवला होता. २००७ मध्ये एका विवाहितेच्या आत्महत्येच्या प्रकरणात तिचा पती बलवीर सिंह आणि तिच्या सासूला दोषी ठरवण्यात आले होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Courts should be sensitive to womens cases supreme court notice ysh

First published on: 08-10-2023 at 00:20 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×