गीता आणि बबिता फोगटच्या बहिणीची आत्महत्या

कुस्ती क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे

संग्रहित

भारतीय कुस्तीपटू गीता फोगट आणि बबिता फोगट यांची चुलत बहिण रितिका फोगटने आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे. रितीका फोगटने आत्महत्या केल्याच्या वृत्तामुळे कुस्ती क्षेत्रालाही मोठा धक्का बसला आहे. रितिका फक्त १७ वर्षांची होती. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, भारतपूर येथे बुधवारी पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेत झालेल्या पराभवामुळे खचल्यान रितिकाने आत्महत्या केली.

आमीर खानच्या ‘दंगल’ चित्रपटामुळे फोगट कुटुंब प्रसिद्धीस आलं. रितिकादेखील याच कुटुंबाचा भाग होती. रितिका राज्यस्तरीय उप-कनिष्ठ, कनिष्ठ महिला आणि पुरुष कुस्ती स्पर्धा खेळत होती. १४ मार्चला खेळण्यात आलेल्या अंतिम सामन्यात फक्ता एका गुणाने रितिकाचा पराभव झाला. हा पराभव जिव्हारी लागल्याने रितिकाने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली.

रितिकाने द्रोणाचार्य पुरस्कार विजेते महावीर सिंग फोगट यांच्याकडून प्रशिक्षण घेतलं होतं. स्पर्धेदरम्यान तेदेखील उपस्थित होते. रितिका महावीर फोगट स्पोर्ट्स अकॅडमीची विद्यार्थिनी होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Cousin of geeta and babita phogat ritika phogat commits suicide sgy

ताज्या बातम्या