scorecardresearch

Covid 19 Booster Dose: १० एप्रिलपासून १८ वर्षांवरील सर्वांना बूस्टर डोस; केंद्र सरकारचा निर्णय

Covid 19 Booster Dose: खासगी केंद्रावर बूस्टर डोस दिला जाणार आहे; आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली माहिती

(प्रातिनिधिक छायाचित्र)

Booster Dose for all Adults : करोना व्हायरसच्या बूस्टर डोसबाबत मोठी माहिती समोर येत आहे. आता १८ वर्षांवरील सर्वांना करोनाचा बूस्टर डोस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार १० एप्रिलपासून १८ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील लोकाना बूस्टर डोस मिळेल. खासगी केंद्रांवर हा बूस्टर डोस दिला जाणार आहे.

एखाद्याला बूस्टर डोस घ्यायचा असेल, तर खासगी हॉस्पिटलमध्येही ही सुविधा उपलब्ध होणार आहे. आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, ज्यांचे वय १८ वर्षांहून अधिक आहे आणि दोन्ही डोस घेतले असून, दुसऱ्या डोसला ९ महिन्यांहून अधिक कालावधी झाला आहे, ते करोनाचा प्रतिबंधात्मक डोस घेऊ शकतात. खासगी केंद्रांवरही ही सुविधा उपलब्ध होणार आहे.

तसेच आरोग्य सेवा कर्मचारी आणि ६० वर्षांवरील नागरिकांसाठी बूस्टर डोस सरकारी लसीकरण केंद्रांवर मोफत सुरूच राहील आणि त्याला गती दिली जाईल, असं आरोग्य मंत्रालयाकडून सांगणयात आलं आहे.

या अगोदर केवळ आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांनाच बूस्टर डोस दिला जात होता. त्यामुळे सर्वसामान्यांना बूस्टर डोस कधी मिळणार याची प्रतिक्षा होती. 

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Covid 19 booster dose for all 18 year above olds from april msr

ताज्या बातम्या