मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह भारतात करोना विषाणूचा संसर्ग पुन्हा वाढत आहे. वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय संस्था सतर्क झाल्या आहे. खबरदारीचा उपाय म्हणून विविध उपक्रम राबवले जात आहेत. तसेच करोना नियमांचं काटेकोर पालन करण्याबाबत नागरिकांना आवाहन केलं जात आहे. सोमवारी भारतातील नवीन करोना रुग्णांमध्ये जवळपास १० टक्क्यांची वाढ झाली आहे.

भारतातील करोना रुग्णांच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आयएमए अर्थात इंडियन मेडिकल असोसिएशनने तीन प्रमुख कारणं सांगितली आहेत. “कोविड-१९ नियमांमध्ये शिथिलता, करोना चाचण्यांमध्ये झालेली घट आणि कोविड-१९ चे नवीन व्हेरिएंट” या तीन कारणांमुळे भारतात करोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचं निरीक्षण इंडियन मेडिकल असोसिएशनने नोंदवलं आहे.

international monetary fund praises india for maintaining fiscal discipline in election year
निवडणूक वर्षातही भारताकडून वित्तीय शिस्त कायम; आंतरराष्ट्रीय़ नाणेनिधीकडून कौतुक; आघाडीच्या देशांमध्ये स्थान कायम राहणार
Central government confirms purchase of five lakh metric tonnes of onions from Maharashtra
निवडणुकीत कांदाखरेदीचा प्रचार? महाराष्ट्रातून पाच लाख मेट्रिक टन कांदाखरेदीची केंद्राची ग्वाही
wheat, farmers
केंद्राचा ‘हा’ निर्णय गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर?
adequate blood supply across maharashtra
यंदाच्या उन्हाळयात राज्यभर पुरेसा रक्तसाठा 

हेही वाचा- VIDEO : करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे देशभरात दोन दिवसीय ‘करोना मॉकड्रिल’, पायाभूत सुविधांचा घेतला जाणार आढावा

सोमवारी भारतात नवीन करोना रुग्णांच्या संख्येत जवळपास १० टक्के वाढ नोंदली आहे. करोनाचा वाढता आलेख पाहता देशात पुन्हा एकदा करोना निर्बंध लादण्याची भीती लोकांना सतावत आहे.