करोना काळात २०२० मध्ये कृषी क्षेत्रापेक्षाही उद्योग क्षेत्राला जास्त फटका बसल्याचं केंद्र सरकारच्या आकडेवारीतून समोर आलं आहे. करोना संकट आणि लॉकडाउन यामुळे उद्योग क्षेत्राला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. दरम्यान २०२० मध्ये एकूण ११ हजार ७१६ उद्योजकांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती केंद्र सरकारडून संसदेत देण्यात आली आहे. २०१९ च्या तुलनेत म्हणजेच करोना संकट येण्यापूर्वीच्या काळात तुलना करता ही आकडेवारी २९ टक्क्यांनी वाढली आहे.

गृह मंत्रालयाने नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या (NCRB) डेटाच्या आधारे दिलेल्या माहितीनुसार, २०१० मध्ये ९०५२ उद्योजकांनी आत्महत्या केली. तर २०२० मध्ये ११ हजार ७१६ उद्योजकांनी आत्महत्या करत जीवन संपवलं.

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
Women officers and employees are fully responsible for voting stations where number of women voters is more than men
महिलांच्या हाती मतदान केंद्राची दोरी…
bank of Maharashtra loan disbursement increased by 16 percent
‘महाबँके’च्या कर्ज वितरणात १६ टक्क्यांची वाढ

एनसीआरबीच्या डेटानुसार, उद्योजकांनी केलेल्या आत्महत्येचा आकडा हा शेतकऱ्यांच्या तुलनेत जास्त आहे. २०२० मध्ये १० हजार ६६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. २०१५ च्या तुलनेत ही आकडेवारी चिंता निर्माण करणारी आहे. दरम्यान उद्योजकांच्या आत्महत्येच्या आकडेवारीत कृषी क्षेत्राशी (३.९ टक्के) तुलना करता २९.४ टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, कृषी क्षेत्रात महिलांची आत्महत्या गृहिणींची आत्महत्या म्हणून ग्राह्य धरली जाते.

एनसीआरबीच्या डेटानुसार, २०२० मध्ये आत्महत्या केलेल्या ११ हजार ७१६ उद्योजकांपैकी ४२२६ दुकानदार, ४३५६ व्यापारी आणि ३१३४ जण इतर व्यवसायात गुंतलेले होते. २०२१ च्या आकडेवारीतही हा आकडा मोठा असेल अशी चिंता आहे.