Covid 19: ओमिक्रॉनला रोखण्यासाठी मोदी सरकारकडून आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नियमावली जाहीर; जाणून घ्या नियम

विदेशी प्रवाशांना आपल्या १४ दिवसांच्या प्रवासाची माहिती द्यावी लागणार आहे

Covid 19, Omicron, guidelines for international travellers, Omicron news, Omicron cases news,
विदेशी प्रवाशांना आपल्या १४ दिवसांच्या प्रवासाची माहिती द्यावी लागणार आहे (File Photo: PTI)

आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये ‘ओमिक्रॉन’ या करोनाच्या नव्या उत्परिवर्तित विषाणूचा फैलाव वेगाने वाढत असल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. आरोग्य मंत्रालयाने भारतात येणाऱ्या विदेशी प्रवाशांसाठी नियमावली जाहीर केली आहे. ही नियमावली १ डिसेंबरपासून लागू होणार आहे. यानुसार विदेशी प्रवाशांना आपल्या १४ दिवसांच्या प्रवासाची माहिती द्यावी लागणार आहे. तसंच प्रवासाआधी एअर सुविधा पोर्टलवर आपला निगेटिव्ह आरटीपीआर टेस्ट रिपोर्ट टाकणं बंधनकारक असणार आहे.

परदेशी प्रवाशांवर लक्ष ; चाचण्या वाढविण्याचे केंद्राचे निर्देश; आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीचा फेरविचार

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने विदेशी प्रवाशांच्या चाचण्या, जनुकीय क्रमनिर्धारण आणि त्यांचा प्रवास इतिहास नोंदवण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या नियमावलीनुसार, धोका असणाऱ्या (countries at risk) देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर करोना चाचणी केली जाईल. तसंच या चाचणीचा रिपोर्ट येईपर्यंत या प्रवाशांना विमानतळावरच थांबावं लागणार आहे. जर रिपोर्ट निगेटिव्ह आला तर त्यांना सात दिवसांसाठी विलगीकरणात राहण्याचा प्रक्रिया पाळावी लागेल. आठव्या दिवशी पुन्हा चाचणी करण्यात येईल. त्यावेळीही रिपोर्ट निगेटिव्ह आला तर सात स्वत: दिवसांसाठी काळजी घ्यावी लागेल.

ज्या देशांमधून धोका नाही तेथील प्रवाशांना विमानतळावरुन जाण्याची परवानगी देण्यात येईल. मात्र त्यांनाही १४ दिवस लक्ष ठेवावं लागणार आहे. एकूण प्रवाशांच्या पाच टक्के प्रवाशांची विमानतळावर चाचणी केली जाईल.

कोणत्या देशांकडून धोका असल्याची भीती

शनिवारी केंद्राने अनेक देशांना धोका असणाऱ्या यादीत टाकलं आहे. यामध्ये दक्षिण आफ्रिका, चीन, बोत्सावना, युके, ब्राझिल, इस्त्राईल, बांगलादेश, मॉरिशिअस, न्यूझीलंड, झिम्बॉम्बे, सिंगापूर आणि हाँगकाँग यांचा समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीबाबत फेरविचार

‘ओमिक्रॉन’चा प्रादुर्भाव वाढत असल्याने आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतूक सुरू करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी रविवारी तातडीची बैठक घेतली. बैठकीत १५ डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सुरू करण्याबाबत फेरविचाराचा निर्णय घेण्यात आला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Covid 19 omicron variant scare india revises guidelines for international travellers sgy

ताज्या बातम्या