दिवाळीत करोनापासून दिलासा; गेल्या २४ तासांत ११,४५१ नवीन रुग्णांची नोंद, सक्रिय रुग्णसंख्या केवळ ०.४२ टक्के

देशातील चार राज्यांमध्ये केवळ १८ जिल्हे आहेत जिथे सकारात्मकता दर १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे

COVID-19 Update in India, Coronavirus Update

देशात सणासुदीच्या काळातही करोना रुग्णांच्या संख्येत फारशी वाढल झालेली नाही. गेल्या २४ तासांत केवळ ११,४५१ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्याच वेळी, १३,२०४ लोकांनी करोनावर मात केली आहे. मात्र, यादरम्यान २६६ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशातील चार राज्यांमध्ये केवळ १८ जिल्हे आहेत जिथे सकारात्मकता दर १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तर एकूण सक्रिय रुग्णसंख्या केवळ ०.४२ टक्के आहे, जी मार्च २०२० नंतरचे सर्वात कमी आहे.

सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या १,४२,८२६ आहे. त्याच वेळी, पुनर्प्राप्ती दर ९८.२४ टक्के आहे, जो मार्च २०२० पासून सर्वाधिक आहे. सणासुदीच्या काळात करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत होते. पण सहा नोव्हेंबर रोजी संपलेल्या सणासुदीच्या आठवड्यानंतर देशभरातील केवळ १८ जिल्ह्यांमध्येच करोना पॉझिटिव्ही रेट १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. म्हणजेच देशाच्या मोठ्या भागात करोनाच्या रुग्णांमध्ये फारशी वाढ झालेली नाही.

जर पॉझिटिव्हिटी रेट १० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर ते करोना संसर्गाच्या गतीसाठी धोकादायक मानले जाते. त्याचबरोबर डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, जर पॉझिटिव्ह दर पाच टक्क्यांपेक्षा जास्त असेल, तर संसर्गाची वाढ लक्षात घेऊन निर्बंध लादले पाहिजेत.

आरोग्य मंत्रालयाने करोना संसर्गाच्या वेगानुसार जिल्ह्यांची तीन श्रेणींमध्ये विभागणी केली आहे. यामध्ये, पाच टक्क्यांपेक्षा जास्त सकारात्मकता दर, पाच ते १० टक्क्यांदरम्यान सकारात्मकता दर आणि १० टक्क्यांहून अधिक सकारात्मकता दर असलेले जिल्हे आहेत. तीन ऑक्टोबर रोजी १० टक्क्यांहून अधिक सकारात्मकता दर असलेल्या जिल्ह्यांची संख्या ३३ होती. २२ ऑक्टोबरपर्यंत ही संख्या २८ वर आली होती. आता फक्त १८ जिल्हे उरले आहेत. आतापर्यंत १० टक्‍क्‍यांहून अधिक सकारात्मकता दर असलेले जिल्हे १० राज्यांपर्यंत होते. आता फक्त केरळ, मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि नागालँड ही चार राज्ये आहेत. केरळमध्ये नऊ, मिझोराममध्ये सात आणि अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये प्रत्येकी एक जिल्हे आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Covid 19 update in india coronavirus deaths active cases vaccinations abn 97

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य
ताज्या बातम्या