Corona Update : भारतात करोनाचे ११,८५० नवे रुग्ण; गेल्या २४ तासांत ५५५ मृत्यू

शुक्रवारी देशात १२,४०३ करोना रुग्ण उपचारानंतर घरी परतले आहे

COVID-19 Update in India, Coronavirus Update

गेल्या २४ तासांत देशात ११,८५० नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह, शुक्रवारी देशात १२,४०३ करोना रुग्ण उपचारानंतर घरी परतले आहे. यानंतर, देशातील करोनामधून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३,३८,३६,४८३ झाली आहे. त्याच वेळी, सध्या देशात फक्त १,३६,३०८ सक्रिय रुग्ण शिल्लक आहेत. गेल्या २७४ दिवसांतील हा नीचांक आहे. तर देशात गेल्या २४ तासांत ५५५ रुग्णांना करोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

यासह, देशातील सक्रिय प्रकरणे एकूण प्रकरणांपैकी एक टक्क्यांपेक्षा कमी आहेत. आता देशात ०.४० टक्के प्रकरणे शिल्लक आहेत. मार्च २०२० नंतरचा हा नीचांक आहे. दुसरीकडे, दैनिक सकारात्मकता दर ०.९४ टक्क्यांवर गेला आहे. गेल्या ४० दिवसांपासून तो दोन टक्क्यांपेक्षा कमी राहिला आहे. यासह, देशातील साप्ताहिक सकारात्मकता दर १.०५ टक्के आहे, जो गेल्या ५० दिवसांपासून दोन टक्क्यांच्या खाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात करोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या तीन कोटी ४४ लाख २६ हजार ३६ झाली आहे. त्याचबरोबर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या एक लाख ३६ हजार ३०८ वर आली आहे. त्याचबरोबर या साथीमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या चार लाख ६३ हजार २४५ झाली आहे.

देशात सलग ३६ दिवस करोना रुग्णांची दैनंदिन संख्या २० हजारांहून कमी आहेत. आकडेवारीनुसार, आतापर्यंत एकूण तीन कोटी ३८ लाख २६ हजार ४८३ लोक करोनामुक्त झाले आहेत, तर मृत्यूचे प्रमाण सुमारे १.३० टक्के आहे. दरम्यान, देशव्यापी लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत १११ कोटीहून अधिक करोनावरील लसीचे डोस देण्यात आले आहेत. शुक्रवारी ५८ लाख ४२ हजार ५३० डोस देण्यात आले, त्यानंतर आतापर्यंत लसीचे १११ कोटी ४० लाख ४८ हजार १३४ डोस देण्यात आले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Covid 19 update in india coronavirus deaths active cases vaccinations abn 97

ताज्या बातम्या