देशात पुन्हा एकदा करोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. मात्र यादरम्यान मृतांचा आकडा वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत करोनाचे ९,११९ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, ३९६ करोना रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तसेच १०,२६४ रुग्ण करोनावर मात करुन घरी परतले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात आता एकूण १,०९,९४० सक्रिय रुग्ण शिल्लक आहेत. जे ५३९  दिवसांनंतरचे सर्वात कमी आहेत.

बुधवारी देशात करोनाचे ९,२८३ नवीन रुग्ण आढळून आले होते तर ४३७ लोकांचा मृत्यू झाला होता. बुधवारी १०,९४९ रुग्णांनी करोनावर मात केली होती.

करोनाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी ४५ लाख ४४ हजार ८८२ लोकांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी चार लाख ६६ हजार ९८० लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ३ कोटी ३९ लाख ६७ हजार लोक करोनातून बरे झाले आहेत. देशात करोना सक्रिय रुग्णांची संख्या सुमारे एक लाख आहे. एकूण १ लाख ९ हजार ९४० रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २४ नोव्हेंबरपर्यंत देशभरात करोना लसीचे ११९ कोटी ३८ लाख ४४ हजार डोस देण्यात आले आहेत. बुधवारी ९०.२७ लाख लसीकरण करण्यात आले. त्याच वेळी, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनुसार, आतापर्यंत सुमारे ६३.५९ कोटी करोना चाचण्या झाल्या आहेत. बुधवारी ११.५० लाख करोना चाचण्या करण्यात आल्या, ज्यांचा पॉझिटिव्ह रेट १ टक्क्यांपेक्षा कमी आहे.